बोगस दिव्यांग प्रमाणपत्र; जिल्ह्यातील ५२ शिक्षक निलंबित, बीडमधील घटना

By सोमनाथ खताळ | Published: January 23, 2023 04:13 PM2023-01-23T16:13:25+5:302023-01-23T16:14:22+5:30

बदलीसाठीची लढवलेली शक्कल गुरूजींच्या आली अंगलट

Beed Fake Disability Certificate case 52 teachers suspended | बोगस दिव्यांग प्रमाणपत्र; जिल्ह्यातील ५२ शिक्षक निलंबित, बीडमधील घटना

बोगस दिव्यांग प्रमाणपत्र; जिल्ह्यातील ५२ शिक्षक निलंबित, बीडमधील घटना

Next

बीड : जवळची शाळा मिळावी, सोयीच्या ठिकाणी बदली मिळावी, यासाठी शिक्षकांनी दिव्यांग प्रमाणपत्र जोडले होते. परंतू ते बोगस असल्याची तक्रार झाल्यानंतर त्यांची पुनर्तपासणी झाली. यात हे प्रमाणपत्र बोगस आढळल्याने तब्बल ५२ शिक्षकांवर निलंबणाची कारवाई करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार यांनी सोमवारी हे आदेश काढले आहेत.

जिल्हा परिषद शिक्षकांची ऑनलाईन प्राणालीद्वारे बदली करण्याची प्रक्रिया सुरू होती. परंतू यातील अनेक शिक्षकांनी सोयीचे ठिकाण मिळावे, यासाठी बोगस दिव्यांग प्रमाणपत्र काढले होते. याबाबत सीईओंकडे तक्रारी झाल्या. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील ३३६ शिक्षकांची सुनावणी ठेवण्यात आली. यातील २३६ शिक्षकांची स्वारातीमध्ये पूनर्तपासणी करण्यात आली होती. यामध्ये ५२ शिक्षकांचे प्रमाणपत्र बोगस असल्याचे समोर आले. या सर्वांनाच निलंबीत करण्यात आले आहे. सीईओ अजित पवार यांनी ही कारवाई केली आहे.

यांच्यावर झाली निलंबनाची कारवाई

१) धनंजय गोविंदराव फड अंबाजोगाई अल्पदृष्टी, २) रविकांत सुधाकर खेपकर अंबाजोगाई अस्थिव्यंग, ३) अशोक वामनराव यादव अंबाजोगाई अस्थिव्यंग, ४) चिंतामण तुकाराम मुंड़े अंबाजोगाई अस्थिव्यंग, ५) राजू शंकर काळे आष्टी (मुलगी दिशा राजू काळे कर्णबधीर), ६) वर्षा रामकिसन पोकळे आष्टी कर्णबधीर, ७) राजेंद्र शिवाजी हजारे आष्टी (पत्नी धोंडे सुषमा लक्ष्मण कर्णबधीर, ८) अमोल कुंडलीक शिंदे आष्टी अल्पदृष्टी ९) आनंद सिताराम थोरवे आष्टी अस्थिव्यंग, १०) मनिषा उत्तमराव धोंडे आष्टी (पती हुमे रविंद्र उत्तमराव अस्थिव्यंग), ११) देविदास भानुदास नागरगोजे केज अल्पदृष्टी, १२) आसाराम पांडुरंग चेंडुळे गेवराई अल्पदृष्टी १३) रमेश ज्ञानोबा गाढे गेवराई अल्पदृष्टी, १४) हनुमान यशवंत सरवदे गेवराई अल्पदृष्टी १५) सुधाकर दगडू राऊत गेवराई अस्थिव्यंग, १६) अरूण भीमराव चौधरी गेवराई अस्थिव्यंग, १७) महादेव सखाराम जाधव गेवराई अस्थिव्यंग, १८) मनोजकुमार अशोकराव जोशी गेवराई अस्थिव्यंग, १९) मनोजकुमार मधुकर सावंत गेवराई अस्थिव्यंग, २०) अनिता गोविंदराव यादव गेवराई (पती सावंत मनोजकुमार मधुकर अस्थिव्यंग), २१) अर्चना भगवान इंगळे धारूर अस्थिव्यंग, २२) शांताराम भानुदासराव केंद्रे परळी अल्पदृष्टी, २३) मनोज नरसिंगराव सुर्यवंशी परळी अल्पदृष्टी, २४) दिपक भालचंद शेप परळी अल्पदृष्टी, २५) ज्ञानदेव नवनाथ मुटकूळे पाटोदा अल्पदृष्टी, २६) गणेश भागवत ढाकणे पाटोदा अल्पदृष्टी, २७) पांडुरंग आबासाहेब गवते बीड कर्णबधीर, २८) शितल शहादेव नागरगोजे बीड कर्णबधीर, २९) स्वाती चंद्रसेन शिंदे बीड कर्णबधीर, ३०) भारती मुरलीधर गुजर बीड कर्णबधीर, ३१) आंबिका बळीराम बागडे बीड कर्णबधीर, ३२) विमल नामदेव ढगे बीड कर्णबधीर, ३३) जीवन रावसाहेब बागलाने बीड कर्णबधीर, ३४) शोभा आंबादास काकडे बीड कर्णबधीर, ३५ ) वनमाला देविदासराव इप्पर बीड कर्णबधीर. ३६) आश्रुबा विश्वनाथ भोसले बीड अल्पदृष्टी, (३७) राजश्री रघुवीर गावंडे बीड अल्पदृष्टी, ३८) वाजेदा तबस्सुम मोहमद शफीउद्दीन बीड अल्पदृष्टी, ३९) शेला नागनाथ शिंदे बीड (मुलगा काटे हर्षवर्धन सतिष अल्पदृष्टी), ४०) रतन आंबादास बहीर बीड (पत्नी हातवटे अश्विनी विठ्ठलराव अल्पदृष्टी), ४१) दत्तू लक्ष्मण वारे बीड अस्थिव्यंग, ४२) बंडू किसनराव काळे बीड अस्थिव्यंग, ४३) चांदपाशा महेबूब शेख बीड (पत्नी आयेशा सिध्दीका इनामदार अस्थिव्यंग ) ४४) उज्वल्ला अशोक जटाळ (पती भोसले नितीन शत्रुघ्न अस्थिव्यंग ) ४५) आयशा सिद्दीक इनामदार बीड अस्थिव्यंग, ४६) ज्योती लहुराव मुळूक बीड अस्थिव्यंग, ४७) अंजली प्रभाकर भोसले बीड (पती काळे बंडू किसनराव अस्थिव्यंग, ४८) गोविंद अशोक वायकर बीड अस्थिव्यंग, ४९) शेख समीना बेगम शेख हमीद बीड (मुलगा दाणी रियाज शेख अस्थिव्यंग), ५०) सुनीता भारत स्वामी बीह (मलगी स्वामी प्रतिक्षा भारत अल्प) ५१) निवती रामकिशन बेदरे शिरूर (मुलगा बेदरे चंद्रकांत निवती अल्पदृष्टी) ५२) बाळु उमाजी सुरासे शिरूर अल्पदृष्टी अशी निलंबीत केलेल्या शिक्षकांची नावे आहेत.

 

 

 

Web Title: Beed Fake Disability Certificate case 52 teachers suspended

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.