Beed: ज्ञानराधाचे चेअरमन सुरेश कुटे आणखी अडचणीत; माजलगावात तिसरा गुन्हा दाखल
By शिरीष शिंदे | Updated: May 30, 2024 21:30 IST2024-05-30T21:28:30+5:302024-05-30T21:30:30+5:30
Beed News: जास्त व्याज दराचे अमिष दाखवून ७४ लाख २४ हजार रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार दाखल झाली. त्यावरुन माजलगाव शहर ठाण्यात १७ ठेवीदारांची फसवणूक केल्या प्रकरणी ज्ञानराधा मल्टीस्टेटचे अध्यक्ष सुरेश कुटे व अन्य एका विरुद्ध गुरूवारी गुन्हा दाखल झाला आहे.

Beed: ज्ञानराधाचे चेअरमन सुरेश कुटे आणखी अडचणीत; माजलगावात तिसरा गुन्हा दाखल
- शिरीष शिंदे
बीड - जास्त व्याज दराचे अमिष दाखवून ७४ लाख २४ हजार रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार दाखल झाली. त्यावरुन माजलगाव शहर ठाण्यात १७ ठेवीदारांची फसवणूक केल्या प्रकरणी ज्ञानराधा मल्टीस्टेटचे अध्यक्ष सुरेश कुटे व अन्य एका विरुद्ध गुरूवारी गुन्हा दाखल झाला आहे. कुटे यांच्याविरोधातील माजलगावातील तिसरा तर जिल्ह्यातील हा सहावा गुन्हा आहे. त्यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
माजलगाव तालुक्यातील ढेपेगाव येथील बालासाहेब पांडूरंग ढेरे यांच्याकडे बीड येथील ज्ञानराधा मल्टीस्टेट को. ऑप क्रेडीत सोसायटीच्या माजलगाव येथील शाखेचे अध्यक्ष सुरेश कुटे व इतर संचालक मंडळ गेले. आमच्या संस्थेमध्ये ठेवीवर १२ टक्के व्याजदर आहे. तुमच्या मुदत ठेवी तुम्हाला हव्या त्या वेळेस आमची पतस्थंस्था देईल असे आश्वासन दिले. त्यांच्यावर विश्वास ठेऊन ढेरे यांनी त्यांच्या कुटूंबातील व्यक्ती व इतर अशा एकुण १७ जणांच्या ७४ लाख २४ हजार रुपयांच्या ठेवी ठेवल्या. त्यांनी ठेवींची मागणी वारंवार केली असता परत देण्यास टाळाटाळ करण्यात आली. त्यामुळेच ठेविदारांनी थेट माजलगाव शहर पोलिस ठाणे गाठत ज्ञानराधा मल्टीस्टेटचे चेअरमन सुरेश ज्ञानोबा कुटे व इतर संचालक मंडळ व कर्मचारी यांनी यांच्याविरोधात फिर्याद दिली आहे. त्यावरून कुटेंसह इतरांवर गुन्हा दाखल णाला आहे.