बीडमध्ये भिकारी युवतीवर अत्याचार, अल्पवयीन पीडिता सहा महिन्यांची गर्भवती
By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2017 01:37 PM2017-11-19T13:37:54+5:302017-11-19T13:38:09+5:30
परिस्थितीचा फायदा घेऊन एका अल्पवयीन भिकारी युवतीवर मोबाईल शॉपी चालविणाºया तरूणाने वारंवार अत्याचार केला. यातून ती सहा महिन्यांची गर्भवती राहिली.
बीड : परिस्थितीचा फायदा घेऊन एका अल्पवयीन भिकारी युवतीवर मोबाईल शॉपी चालविणाºया तरूणाने वारंवार अत्याचार केला. यातून ती सहा महिन्यांची गर्भवती राहिली. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात आरोपीविरूद्ध गुन्हा दाखल झाला असून त्याला बेड्या ठोकल्या आहेत.
शेख जावेद शेख सलिम (कबाडगल्ली) असे त्या नराधमाचे नाव आहे. पीडिता ही केवळ १५ वर्षांची आहे. तिची आई बशिरगंज परिसरात भिक मागून पोट भरते. तिच्यासोबत तिची मुलगीही असे. मुलगी मोठी असल्याने तिच्यावर याच भागातील जावेदचा डोळा गेला. तिच्या परिस्थितीचा फायदा घेत त्याने मागील उन्हाळ्यापासून ते आजपर्यंत तिच्यावर वारंवार अत्याचार केला. यातून गर्भवती राहिली.
दरम्यान, या घटनेची माहिती शहर पोलिसांना मिळाली. त्यांनी पीडिता व तिच्या आईची चौकशी केली असता हा धक्कादायक प्रकार समोर आला. पीडितेला विश्वास देत पोलिसांनी तिच्याकडून संपूर्ण माहिती घेतली. यावेळी तिने आपल्यावर जावेदने वारंवार अत्याचार केल्याचे सांगितले. त्यानंतर जावेदवर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. जावेदला तात्काळ बशिरगंजमध्ये ताब्यात घेतल्याचे शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सय्यद सुलेमान यांनी सांगितले.
बेघरांना हवाय आधार
बीड पालिकेच्यावतीने लाखो रूपये खर्च करून भाजी मंडईत अलिशान इमारत बांधण्यात आली. परंतु अद्यापही त्या इमारतीत कोणीच रहायला गेलेले नाही. पालिका मात्र आपण भिकाºयांचा सर्व्हे केला आहे. लवकरच त्यांना या इमारतीत वास्तव्यास पाठविण्यात येईल, असे अश्वासन देत आहे. विशेष म्हणजे मागील अनेक वर्षांपासून या इमारतीचे काम सुरू आहे. या ना त्या कारणावरून इमारत भिकाºयांना देण्यास टाळाटाळ केली जात आहे. पालिकेतील राजकारण, आणि अधिकाºयांचे दुर्लक्ष अशा घटनांना निमंत्रण देत आहेत. त्यामुळे संताप व्यक्त होत आहे. ही इमारत लवकरात लवकर भिकाºयांना देण्यात यावी, अशी मागणी होत आहे.