बीड एलसीबीची मोठी कारवाई; गावठी दारू अड्ड्यावर धाड टाकून सहा हजार लिटर रसायन नष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2019 11:39 AM2019-03-16T11:39:59+5:302019-03-16T11:44:54+5:30

तालुक्यातील राजुरी येथे गावठी दारू अड्डयावर स्थानिक गुन्हे शाखेने धाड टाकली.

Beed LCB's big action; Six thousand liters of chemicals destroyed which are used for liquor | बीड एलसीबीची मोठी कारवाई; गावठी दारू अड्ड्यावर धाड टाकून सहा हजार लिटर रसायन नष्ट

बीड एलसीबीची मोठी कारवाई; गावठी दारू अड्ड्यावर धाड टाकून सहा हजार लिटर रसायन नष्ट

googlenewsNext

बीड : तालुक्यातील राजुरी येथे गावठी दारू अड्डयावर स्थानिक गुन्हे शाखेने धाड टाकली. यामध्ये तब्बल सहा हजार लिटर रसायन व २०० लिटर तयार केलेली गावठी दारू नष्ट करण्यात आली आहे. ही कारवाई शनिवारी सकाळी ६ वाजेच्या सुमारास करण्यात आली.

यामध्ये सोमनाथ लाला पवार (रा.राजुरी ता.बीड) याला ताब्यात घेण्यात आले असून सर्व मुद्देमाल जप्त करून बीड ग्रामीण पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही. विशेष म्हणजे याच महिन्यात बीड ग्रामीण ठाणे हद्दीत बनावट दारू अड्डयाचा विशेष पथकाने पर्दाफाश केला होता. आता पुन्हा याच ठाणे हद्दीत मोठी कारवाई झाल्याने खळबळ उडाली आहे. 

ही कारवाई पोलीस अधीक्षक जी.श्रीधर, अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि घनश्याम पाळवदे, बालाजी दराडे, नरेंद्र बांगर, साजेद पठाण, सतीष कातखडे, संजय जायभाये, परमेश्वर सानप आदींनी केली.

Web Title: Beed LCB's big action; Six thousand liters of chemicals destroyed which are used for liquor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.