अखेर बीडमध्ये 'तुतारी' वाजली; बजरंग सोनवणे यांचा निसटता विजय, मुंडे बहीण-भावास धक्का
By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2024 10:05 PM2024-06-04T22:05:35+5:302024-06-04T22:07:16+5:30
Beed Lok Sabha Result 2024: अखेरच्या फेरीत बजरंग सोनवणे यांनी मिळवला विजय
Beed Lok Sabha Result 2024 : बीड लोकसभा मतदारसंघात भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना मोठा धक्का बसला आहे. एकीकडे देशभरातील निकाल हाती आले, तर दुसरीकडे बीडच्या निकालाने शेवटपर्यंत सस्पेन्स कायम ठेवला. कधी पंकजा मुंडे आघाडीवर जात होत्या, तर कधी राष्ट्रवादीचे बजरंग सोनवणे (Bajarang Sonawane) पुढे जात होते. अखेर शेवटच्या ३२ व्या फेरीत बजरंग सोनवणे यांनी बाजी मारली.
२४ व्या फेरी अखेर भाजपाच्या पंकजा मुंडे यांना ३० हजार ४६१ मतांची आघाडी होती. मात्र, २५ व्या फेरीपासून ही लिड घटू लागली. २५ व्या अखेर २२ हजार ५००, २६ वी फेरी १० हजार २७६ , २७ वी फेरी ७ हजार ४२८ अशी आघाडी कमी होत गेली. तर २८ व्या फेरीत बजरंग सोनवणे यांनी ९३२ मतांची आघाडी घेतली. त्यानंतर २९ व्या फेरीत १ हजार २१७, ३० वी फेरी २ हजार ६०२ मतांची आघाडी घेतली. मात्र, ३१ व्या फेरीत पुन्हा पारडे फिरले अन् पंकजा मुंडे ४०० मतांनी पुढे आल्या. परंतु, फेरमतमोजणीची मागणी केल्यानंतर झालेल्या मतमोजणीत शरद पवार गटाचे बजरंग सोनवणे ७००० मतांनी विजयी झाले आहेत.