Beed Lok Sabha Result 2024: बजरंग सोनवणेंच्या आघाडीचा अश्वमेध पंकजा मुंडेंनी सातव्या फेरीला रोखला
By अनिल भंडारी | Published: June 4, 2024 12:28 PM2024-06-04T12:28:11+5:302024-06-04T12:29:57+5:30
Beed Lok Sabha Result 2024: बीडमध्ये चुरशीची निवडणूक, आठव्या फेरीअखेर मुंडे ९,हजार ३६६ मतांनी आघाडीवर
Beed Lok Sabha Result 2024: बीड लोकसभा मतदार संघात सकाळी आठ वाजता टपाली मतमोजणीला तर विधानसभानिहाय मतमोजणीला साडेआठ वाजता गोपनीयतेच्या शपथेसह सुरुवात झाली. सुरूवातीपासून आघाडीवर असलेले राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार बजरंग सोनवणे हे पाचव्या फेरीला ८९४१ मतांनी आघाडीवर होते. परंतू सहाव्या आणि सातव्या फेरीत भाजप महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे यांनी सोनवणे यांचे मताधिक्य कापत बरोबरी गाठण्याकडे वाटचाल केली. सातव्या फेरी अखेर बजरंग सोनवणे हे २०३ मतांनी आघाडीवर होते.
बजरंग सोनवणे यांना पहिल्या फेरीत ५३७४, दुसऱ्या फेरीत २३१९, तिसऱ्या फेरीत २१९७, चौथ्या फेरीत ८९५६, पाचव्या फेरीत ८९४१, सहाव्या फेरीत १३८७ तर सातव्या फेरीअखेर २०३ मतांची आघाडी मिळाली. सातव्या फेरीअखेर भाजप महायुतीच्या पंकजा मुंडे यांना १ लाख ६५ हजार ०६ मते मिळाली. तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे बजरंग सोनवणे यांना १ लाख ६५ हजार २०९ मते मिळाली. तर आठव्या फेरीला पंकजा मुंडे यांनी झेप घेत ९ हजार ३६६ मतांची आघाडी घेतली. या फेरीअखेर पंकजा मुंडे यांना एकूण १ लाख ९३ हजार ९२२ तर बजरंग सोनवणे यांना १ लाख ८४ हजार ५५६ मते मिळाली.