Beed Lok Sabha Result 2024: बीडमध्ये बजरंग सोनवणेची जोरदार टक्कर; पंकजा मुंडे पिछाडीवर
By सोमनाथ खताळ | Published: June 4, 2024 10:32 AM2024-06-04T10:32:07+5:302024-06-04T10:33:05+5:30
Beed Lok Sabha Result 2024: जातीय समिकरण चर्चेत आल्याने बीडमध्ये प्रचाराचे वारे फिरले होते.
Beed Lok Sabha Result 2024: राज्यातील बिग फाईट असलेल्या बीड लोकसभा मतदारसंघात बीडचा समावेश आहे. भाजपाच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे ( Pankaja Munde ) आणि शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी कॉँग्रेसचे बजरंग सोनवणे ( Bajrang Sonawane ) यांच्यात येथे थेट लढत होत आहे.
बीड लोकसभेसाठी यावेळी तब्बल ४१ उमेदवार हे निवडणूक रिंगणात उतरले होते. यामध्ये महायुतीकडून भाजपच्या पंकजा मुंडे, महाविकास आघाडीकडून शरद पवार गटाचे बजरंग सोनवणे आणि वंचित बहुजनकडून अशोक हिंगे यांचा समावेश होता. परंतु, खरी लढत ही मुंडे आणि सोनवणे यांच्यातच झाली. यावेळी पहिल्यांदाच निवडणुकीत जातीचा मुद्दा चर्चेत राहिला. अगदी गावातील कॉर्नर बैठकीपासून ते देशाच्या नेत्यापर्यंतच्या सभांमध्ये जातीचा मुद्दा निघाला होता. तसेच यावेळी मतदानाचा टक्काही पावणे चारने वाढला होता. या सर्व टक्केवारीचा अंदाज आणि जातीय समीकरणे जुळवून कार्यकर्त्यांकडून विजयाचे दावे - प्रतिदावे केले जात आहेत.
जातीय समिकरण चर्चेत आल्याने बीडमध्ये प्रचाराचे वारे फिरले होते. यामुळे मतमोजणीनंतर निकालात कोण पुढे असेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. चार फेऱ्यांची आकडेवारी हाती आली असून यात राष्ट्रवादीचे बजरंग सोनवणे हे ८ हजार ९६५ मतांनी आघाडीवर आहेत.
फेरी क्रमांक - 4
पंकजा मुंडे-92325
बजरंग सोनवणे-101281
आघाडी -8956 (बजरंग सोनवणे)