परराज्यातील धान्यावरच बीडच्या मोंढ्याची मदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2019 12:00 AM2019-07-05T00:00:48+5:302019-07-05T00:01:27+5:30

मागील वर्षीचे खरीप आणि रबी दोन्ही हंगाम पूरेशा पावसाअभावी वाया गेल्याने जिल्ह्यातील दुष्काळाचे सावट जुलै उजाडल्यानंतरही दूर झालेले नाही. अशा परिस्थितीत गहू, ज्वारी आणि बाजरी या धान्याची परराज्यातून आवक होत आहे.

Beed mango beans on the top of the state | परराज्यातील धान्यावरच बीडच्या मोंढ्याची मदार

परराज्यातील धान्यावरच बीडच्या मोंढ्याची मदार

Next
ठळक मुद्देस्थानिक आवक नगण्य : महिन्याला ४०० टन गव्हाची आवक

बीड : मागील वर्षीचे खरीप आणि रबी दोन्ही हंगाम पूरेशा पावसाअभावी वाया गेल्याने जिल्ह्यातील दुष्काळाचे सावट जुलै उजाडल्यानंतरही दूर झालेले नाही. अशा परिस्थितीत गहू, ज्वारी आणि बाजरी या धान्याची परराज्यातून आवक होत आहे. आठवड्याला जवळपास जवळपास ६०० टन धान्य येथील मोंढा व किराणा बाजारात येत असून त्यावरच येथील उलाढाल कमी- अधिक प्रमाणात सुरु आहे.
दुष्काळजन्य स्थितीमुळे येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये धान्यांची आवक कमी होत राहिली. पेरणी हंगामात शेती मशागतीसह बियाणे, खते खरेदीसाठी पैशांची तजवीज करावी लागते. त्यामुळे शेतकरी अधिकचे राखून ठेवलेले धान्य विक्रीला आणतात. त्यामुळे आवकही वाढलेली असते, असा आतापर्यंतचा अनुभव आहे. परंतू यंदा दोन्ही हंगामात निसर्गाची साथ मिळाली नाही. पहिल्या वेचणीतच कापूस संपला. तूर, हरभरा, सोयाबीन शासनाला तसेच बाजारात विकला. ज्वारी आणि बाजरीचा पेरा कमी असल्याने उत्पादनातही घट झाली. त्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांना बाजारातून धान्य खरेदी करावे लागले. परिणामी सध्या बाजार समितीत स्थानिक धान्याची आवक नगण्य आहे. त्यामुळे स्टॉकिस्ट, आडत व्यापाऱ्यांनी परराज्यातील व्यापाºयांशी सौदे करुन धान्याचे व्यवहार केले. येथील मोंढ्यात ज्वारी, बाजरी आणि गहू परराज्यातून आवक होत आहे. ज्वारीची स्थानिक आवक फारशी नसल्याने कर्नाटक तसेच सोलापूर, बार्शी भागातून आयात होत आहे. कर्नाटक दुर्री ज्वारीचा २५ ते ४० रुपयांपर्यंत दर्जानुसार भाव आहे. राजस्थानच्या अलवर, दौसा, जयपूर भागातून तसेच उत्तर प्रदेश आणि गुजरात - महाराष्टÑ सीमावर्ती भागातून बाजरीची आवक होत आहे. २१५० ते २३०० रुपये क्विंटल भाव आहेत. मध्यंतरी उन्हाळ्यामुळे ग्राहकी कमी होती, मात्र वातावरणात थंडावा निर्माण होताच मागणी वाढण्याची शक्यता आहे. आठवड्याला ५० ते ६० टन बाजरीची आवक असल्याचे व्यापारी म्हणाले. बीड जिल्ह्यात मध्यप्रदेशातून गव्हाची आवक होत आहे. विविध नावाने ३० किलोचे सीलबंद कट्टे विक्रीस आहेत. साधारण प्रतीच्या गव्हाला २३००, मध्यम प्रतीचा गहू २६०० ते २७०० रुपये प्रती क्विंटल आहे. आठवड्यातून ४० ते ५० टन गव्हाची आवक येथील मोंढ्यात होत आहे. यात सिहोर मंडीतील दर्जेदार गहू ३८ ते ४० रुपये किलोपर्यंत विकला जात आहे. सोयाबीनची आवकही १५ दिवसात केवळ १०० क्विंटलच झाली. शेतकºयांकडे मालच नाही, स्टॉकिस्टच वेळप्रसंगी विक्रीस काढत आहेत. तूरची आठवड्याला ५० ते १०० क्विंटल आवक होत आहे. जुना हरभरा ३९०० ते ४३०० रुपये दराने विकला गेला. यामुळे बाजारात दरररोज शुकशुकाट असतो. खरेदी- विक्री होत नसल्याने उलाढालीवर परिणाम झाला आहे. यातच हमाल, चाळणा कामागरांना एखादी गाडी बाजारात आली तरच मोलमजुरी मिळते. स्थानिक आवक नसल्याने परराज्यातील धान्यावरच सध्या मोंढा बाजाराची मदार आहे.

Web Title: Beed mango beans on the top of the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.