बीड नगर परिषद पोटनिवडणुकीसाठी १६ उमेदवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2019 12:53 AM2019-01-10T00:53:21+5:302019-01-10T00:54:26+5:30
बीड नगर पालिकेच्या प्रभाग क्र. ११ (अ) मधील पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसांपर्यंत एकूण १६ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : बीड नगर पालिकेच्या प्रभाग क्र. ११ (अ) मधील पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसांपर्यंत एकूण १६ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. काकू-नाना आघाडीच्या नगरसेवक आर्शिया बेगम चाऊस यांच्या अपात्रतेमुळे या वार्डात पोटनिवडणूक जाहीर झाली आहे, त्यासाठी दि.२७ रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.
बीड नगर पालिकेच्या वार्ड क्र.११ (अ) मधील नगरसेवक आर्शिया बेगम सईद चाऊस यांना तीन अपत्याच्या कारणावरुन अपात्र करण्यात आले होते.
त्यानंतर या प्रभागात पोटनिवडणूक जाहीर करण्यात आलेली आहे. यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा बुधवारी शेवटचा दिवस होता. यात शेवटच्या दिवशी १६ उमेदवार रिंगणात उतरले असून, त्या उमेदवारांनी २६ अर्ज दाखल केले आहेत.
उमेदवारी अर्ज दाखल केलेल्यांमध्ये शेख समीरा बेगम, खान सुमैय्या, खान सगीरा बेगम, छायाबाई क्षीरसागर, उषा ढाकणे, बागवान अफसरा बेगम, शबाना शेख, उज्ज्वला सुरवसे, शेख आयशा बेगम, मनीषा झेंडे, रेणुका भालेकर, मोमीन खमरोनिसा, मोमीन मसरत शरिफोद्दीन, सय्यद सायराबानो, अन्सारी मसरत सुल्ताना, शेख शिरीन फातेमा यांचा समावेश आहे.
या प्रभागातील पोटनिवडणुकीसाठी २७ जानेवारी रोजी मतदान होणार आहे. मतमोजणी लगेचच दुसऱ्या दिवशी दि २८ जानेवारी होणार आहे. या प्रभागात राष्ट्रवादी, शिवसेना, काकू-नाना आघाडीसह इतर पक्षांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. तीन अपत्याच्या कारणावरुन अपात्र करण्यात आल्यानंतर होत असलेल्या पोटनिवडणुकीकडे प्रभागातील मतदारांचे लक्ष लागले आहे.