बीड नगरपालिकेला पुन्हा 'ओडीएफ प्लस प्लस'चा दर्जा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2021 04:19 AM2021-03-29T04:19:32+5:302021-03-29T04:19:32+5:30

बीड : येथील नगरपालिकेने स्वच्छ सर्वेक्षण २०२१ अंतर्गत पुन्हा एकदा ‘ओडीएफ प्लस प्लस’चा दर्जा प्राप्त केला आहे. शासनाने नुकताच ...

Beed Municipality again gets 'ODF Plus Plus' status | बीड नगरपालिकेला पुन्हा 'ओडीएफ प्लस प्लस'चा दर्जा

बीड नगरपालिकेला पुन्हा 'ओडीएफ प्लस प्लस'चा दर्जा

googlenewsNext

बीड : येथील नगरपालिकेने स्वच्छ सर्वेक्षण २०२१ अंतर्गत पुन्हा एकदा ‘ओडीएफ प्लस प्लस’चा दर्जा प्राप्त केला आहे. शासनाने नुकताच याचा निकाल जाहीर केला आहे. महिन्याच्या सुरुवातीला शहरातील ३३ ठिकाणांची तपासणी केल्यानंतर हा निकाल प्रसिद्ध केला आहे. यामुळे बीड पालिकेच्या शिरपेचात पुन्हा एकदा मानाचा तुरा रोवला गेला आहे.

स्वच्छ भारत अभियान देशभर राबविले जाते. याचअंतर्गत देशातील सर्व नगरपालिका, नगरपंचायती यांना स्वच्छ सर्वेक्षण अभियान राबवून हागणदारीमुक्त करण्याचे ध्येय ठेवले. बीड पालिकेने सुरुवातीपासूनच यात सहभाग नोंदविला. सुरुवातील पालिका ओडीएफ (ओपन डेफिकेशन फ्री) झाली. नंतर २०१९ ला ओडीएफ प्लस आणि २०२० ला ओडीएफ प्लस प्लस झाली. याचा कालावधी एक वर्षाचा होता. बीड पालिकेने पुन्हा सहभाग घेतला असता २०२१ मध्येही ओडीएफ प्लस प्लसच दर्जा प्राप्त करण्यात यश मिळाले आहे. शासनाने नियुक्त केलेल्या एका खाजगी संस्थेने १३ व १४ मार्च रोजी बीड शहरातील ३३ ठिकाणांची पाहणी केली होती. या मुख्य रस्ते, शौचालये, मुतारी, मोकळ्या जागा आदींचा समावेश होता. यात सर्वच शौचालये आणि मुताऱ्या स्वच्छ असल्याचा अहवाल देण्यात आला आहे.

बीड पालिकेच्या यशात मुख्याधिकारी डॉ. उत्कर्ष गुट्टे, अभियंता राहुल टाळके, स्वच्छता निरीक्षक आर. एस. जोगदंड, भागवत जाधव, महादेव गायकवाड, भारत चांदणे, राजू वंजारे, प्रशांत ओव्हाळ यांची भूमिका महत्त्वाची आहे. समन्वयक म्हणून प्रशांत जगताप यांनी काम पाहिलेले आहे. बीड पालिकेच्या या यशाचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे.

काेट

बीड पालिकेने गतवर्षी ‘ओडीएफ प्लस प्लस’ हा दर्जा प्राप्त केला होता. तोच कायम ठेवण्यासाठी पुन्हा सहभाग घेतला आणि यशही मिळाले. या यशात पालिकेतील सफाई कामगारापासून ते अभियंत्यापर्यंत सर्वांचा वाटा आहे. लोकप्रतिनिधी आणि बीडकरांनीही खूप सहकार्य केले.

डॉ. उत्कर्ष गुट्टे, मुख्याधिकारी नगर परिषद, बीड

===Photopath===

280321\282_bed_4_28032021_14.jpg~280321\282_bed_3_28032021_14.jpeg

===Caption===

उत्कर्ष गुट्टे~बीड शहरातील सार्वजिनक शौचालयांच्या भिंतीवर अशाप्रकारे रंगरंगोटी करून त्यावरून घोषवाक्याद्वारे जनजागृतीही करण्यात आली.

Web Title: Beed Municipality again gets 'ODF Plus Plus' status

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.