Beed News: भाजप कार्यालयात शिंदे सेनेच्या दोन्ही जिल्हाप्रमुखांचा सत्कार
By सोमनाथ खताळ | Updated: August 9, 2022 23:09 IST2022-08-09T23:08:44+5:302022-08-09T23:09:12+5:30
Beed News: राज्यात शिवसेना शिंदे गट आणि भाजपने मिळून परिवर्तन घडविले. आता जिल्ह्यातही असेच परिवर्तन घडविण्यासाठी आगामी सर्वच निवडणुका एकत्र लढविणार असल्याचे सूतोवाच भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी काढले.

Beed News: भाजप कार्यालयात शिंदे सेनेच्या दोन्ही जिल्हाप्रमुखांचा सत्कार
बीड : राज्यात शिवसेना शिंदे गट आणि भाजपने मिळून परिवर्तन घडविले. आता जिल्ह्यातही असेच परिवर्तन घडविण्यासाठी आगामी सर्वच निवडणुका एकत्र लढविणार असल्याचे सूतोवाच भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी काढले.
सोमवारी शिंदे सेनेच्या दोन्ही जिल्हा प्रमुखांचा भाजप कार्यालयात बोलावून घेत सत्कार करण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपला वेगळा गट स्थापन करताच बीडमध्ये शिवसेनेचे जिल्हाप्रमुख म्हणून सचिन मुळूक आणि कुंडलिक खांडे यांची नियूक्ती करण्यात आली. या दोघांचाही सत्कार भाजपच्या संघर्षयोद्धा जनसंपर्क कार्यालयात झाला. यावेळी खांडे व मुळूक यांनीही एकत्र निवडणूक लढण्याच्या वक्तव्याला दुजोरा दिला. तसेच भाजप व शिवसेनेचे सलोख्याचे नाते कायम राहिल, असे सांगितले.
यावेळी ॲड.सर्जेराव तांदळे, नवनाथ शिराळे, सलिम जहांगीर, प्रा.नागरगोजे देविदास, चंद्रकांत फड, भगीरथ बियाणी, प्रमोद रामदासी, शरद बडगे, योगीराज भागवत, सरपंच वसंत गुंदेकर, सरपंच रामा बांड, सरपंच बाबुराव कदम, योगीराज भागवत, ऋषिकेश फुंदे, पंकज धांडे, अनिल शेळके, महेश सावंत, सुग्रीव डोके, देवा दहीवाळ, बद्रीनाथ जटाळ, येवले आदींची उपस्थिती होती.