कुटेवाडीचा ग्रामसेवक एस. ए. शेळके यांच्यावर निलंबनाची कारवाई
By अनिल भंडारी | Published: August 6, 2022 11:28 PM2022-08-06T23:28:38+5:302022-08-06T23:28:54+5:30
मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार यांनी दिले आदेश
बीड: तालुक्यातील कुटेवाडी (गायकवाड वाडा) ग्रुप ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक एस. ए. शेळके यांच्यावर सुनावणीनंतर निलंबनाची कारवाई करण्यात आली. मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार यांनी याबाबत आदेश दिले.
तालुक्यातील कुटेवाडी (गायकवाड वाडा) येथे २०१७ ते २०२२ पर्यंतच्या १४ वा आणि १५ वा वित्त आयोगाच्या निधीतून करण्यात आलेली कामे बोगस झाली असून, गैरप्रकार झाल्याबाबत बळीराम बजगुडे यांनी तक्रार देऊन उपोषण केले होते. गावातील रस्ते, विद्युतसह अनेक विकासकामे करावयाची होती. मात्र गावकऱ्यांना अंधारात ठेवून ग्रामसभा न घेता ही कामे बोगस दाखवून मोठया प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचे तक्रारीत म्हटले होते. चौकशी व कारवाईच्या मागणीसाठी बळीराम बजगुडे यांनी गावकऱ्यांना सोबत घेऊन उपोषण केले होते. प्रशासनाने दखल घेत याप्रकरणी सुनावणी घेण्यात आली. सुनावणीनंतर जिल्हा परिषद सेवा अधिनियमानुसार शिस्तभंगाची कारवाई करीत ग्रामसेवक शेळके यांना निलंबित करण्यात आल्याचे समजते.