Video: दर्शनासाठी भुरटा मंदिरात आला अन् देवीच्या गळ्यातील मंगळसत्र घेऊन पळाला

By सोमनाथ खताळ | Published: March 6, 2023 08:00 PM2023-03-06T20:00:55+5:302023-03-06T20:01:31+5:30

बीड शहरातील खासबाग देवीचे दर्शन घेण्यासाठी आलेल्या भुरट्याने देवीच्या गळ्यातील मंगळसत्र घेऊन पळ काढला.

Beed news, thief came to temple for darshan and ran away with the mangalsutra of goddess | Video: दर्शनासाठी भुरटा मंदिरात आला अन् देवीच्या गळ्यातील मंगळसत्र घेऊन पळाला

Video: दर्शनासाठी भुरटा मंदिरात आला अन् देवीच्या गळ्यातील मंगळसत्र घेऊन पळाला

googlenewsNext

बीड : शहरातील खासबाग देवीचे दर्शन घेण्यासाठी आलेल्या एका भुरट्या चोराने देवीच्या गळ्यातील मंगळसत्र घेऊन पळ काढला. ही घटना सोमवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणात पोलीस ठाण्यात नोंद नसली तरी पोलिसांकडून तपास सुरू करण्यात आला आहे.

तुळजापुरचे ठाणे समजले जाणाऱ्या शहरातील खासबाग देवीच्या दर्शनासाठी जिल्हाभरातून भाविक येतात. सोमवारी सकाळी ९ वाजताही लाल शर्ट व चष्मा घातलेला साधारण ३५ ते ४० वर्षे वय असलेला व्यक्ती मंदिरात आला. प्रवेशद्वारावर भाविकांप्रमाणे चप्पल काढली. नंतर गाभाऱ्यात प्रवेश करत पुजारी व बाजुला कोणी नसल्याची संधी साधत त्याने देवीच्या गळ्यातील मंगळसूत्र लंपास केले.

हा प्रकार काही वेळानंतर पुजाऱ्यांच्या लक्षात आला. त्यानंतर त्यांनी लगेच शहर पोलिसांना कल्पना दिली. पोलीस निरीक्षक रवी सानप व त्यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले. शहर पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेचे पथक रात्री उशिरापर्यंत या चोरट्याचा शोध घेत होते, परंतू पोलिसांना यश आले नव्हते. या प्रकरणाची रात्री ७ वाजेपर्यंत ठाण्यात नोंद झालेली नव्हती.

खासाग देवीच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरट्याने लंपास केले आहे. त्याचे सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहेत. याची ठाण्यात नोंद झालेली नसली तरी तपास सुरू करण्यात आला आहे. आमचे डीबी आणि एलसीबीचे पथक चोराच्या शोधार्थ रवाना झाले आहेत. लवकरच त्याचा तपास लागेल.
रवी सानप, पोलीस निरीक्षक शहर पोलीस ठाणे बीड

Web Title: Beed news, thief came to temple for darshan and ran away with the mangalsutra of goddess

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.