बीड - परळी रेल्वेचे काम संथगतीने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2021 04:34 AM2021-08-23T04:34:53+5:302021-08-23T04:34:53+5:30

बीड : नगर-बीड रेल्वे मार्गाचे काम गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. अनेक वर्षे हे काम निधी अभावी बंद होते. ...

Beed - Parli railway work is slow | बीड - परळी रेल्वेचे काम संथगतीने

बीड - परळी रेल्वेचे काम संथगतीने

Next

बीड : नगर-बीड रेल्वे मार्गाचे काम गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. अनेक वर्षे हे काम निधी अभावी बंद होते. परंतु मागील भाजप सरकारच्या काळात या कामाला गती मिळाली. आता पुन्हा हे काम संथगतीने सुरू आहे. तरी या कामाला गती मिळावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

....

नागरिकांनी आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन

बीड : कोरोनाचा अजून प्रभाव संपलेला नाही. परंतु नागरिक कोरोना नियमांचे कसलेच पालन करीत नाही. यामुळे पुन्हा कोरोनाचा धोका वाढण्याची शक्यता आहे. तरी नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन आरोग्य प्रशासनाकडून केले जात आहे.

.....

सौताडा-जामखेड रस्ता दुरुस्तीची मागणी

पाटोदा : बीड- नगर मार्गाचे रस्ता डांबरीकरणाचे काम सुरू आहे. अनेक ठिकाणी काम पूर्ण झाले आहे. परंतु सौताडा ते जामखेड दरम्यान रस्त्याचे काम रखडले आहे. तरी या रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करावे, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

.....

धानोरा परिसरात पाणी टंचाईचे सावट

धानोरा : आष्टी तालुक्यातील धानोरा परिसरात यंदाच्या पावसाळ्यात अजून जोरदार पाऊस झाला नाही. या जवळपास धरणे आटली आहेत. यामुळे विहीर, बोअरची पाणी पातळी खालावली आहे. यामुळे परिसरावर पाणी टंचाईचे सावट आहे.

......

रक्षाबंधन सणामुळे बाजार फुलला

कडा : गेल्या दीड वर्षांपासून कोरोना संचारबंदीचे सावट होते. यामुळे अनेक सण साजरे करता आले नाहीत. आता बाजार उघडले आहे. रक्षाबंधन सण असल्याने कडा बाजारात नागरिकांची गर्दी वाढली आहे. बाजारात महिलांचा उत्साह मोठा दिसून येत आहे.

Web Title: Beed - Parli railway work is slow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.