Beed: खाजगी स्कूल बस झाडावर आदळली; चालकासह विद्यार्थी जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2025 11:52 IST2025-04-05T11:52:25+5:302025-04-05T11:52:50+5:30
आष्टी तालुक्यातील बेलगाव चौकातील घटना

Beed: खाजगी स्कूल बस झाडावर आदळली; चालकासह विद्यार्थी जखमी
- नितीन कांबळे
कडा- आष्टी जवळील बेलगाव चौकात शनिवारी सकाळी सव्वा आठच्या दरम्यान चालकाचा ताबा सुटल्याने खाजगी स्कूल बस झाडावर आदळली. यात चालकासह विद्यार्थि जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.
अहिल्यानगर -बीड राष्ट्रीय महामार्ग परिसरातील विद्यार्थी आष्टी येथे विविध खाजगी शाळेत शिक्षण घेतात. त्यांना नेआण करण्यासाठी एक खाजजी स्कूल बस आहे. आज सकाळी नेहमी प्रमाणे विद्यार्थी घेऊन स्कूलबस आष्टीकडे निघाली. सकाळी सव्वा आठच्या दरम्यान बेलगाव चौकात चालकाचा ताबा सुटल्याने स्कूल बस ( क्रमांक एम.एच १२,एच.बी.१५१४) रस्त्याच्या बाजूच्या झाडावर आदळली. यात चालकासह काही विद्यार्थी जखमी झाली झाल्याची माहिती आहे. आष्टी येथील ग्रामीण रुग्णालयात जखमींना उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.