बीड : १२ दिवसांत एसटीला १.८३ कोटींचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2018 12:14 AM2018-08-04T00:14:05+5:302018-08-04T00:14:47+5:30

आधी दूध उत्पादकांचे आणि त्यानंतर मराठा आरक्षणासाठी सुरु असलेल्या आंदोलनामुळे बारा दिवसांत राज्य परिवहन महामंडळाच्या बीड विभागाला सुमारे १ कोटी ८३ लक्ष ३० हजार ९९८ रुपयांचा फटका बसला आहे.

Beed: Rs 1.83 crore strike in ST in 12 days | बीड : १२ दिवसांत एसटीला १.८३ कोटींचा फटका

बीड : १२ दिवसांत एसटीला १.८३ कोटींचा फटका

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : आधी दूध उत्पादकांचे आणि त्यानंतर मराठा आरक्षणासाठी सुरु असलेल्या आंदोलनामुळे बारा दिवसांत राज्य परिवहन महामंडळाच्या बीड विभागाला सुमारे १ कोटी ८३ लक्ष ३० हजार ९९८ रुपयांचा फटका बसला आहे.
बीड विभागातील बीड, गेवराई, माजलगाव, परळी, अंबाजोगाई, धारूर, पाटोदा आणि आष्टी आगारातून यात्रा स्पेशल आणि नियमित बस फेऱ्यांचे नियोजन होते. मात्र २० जुलै ते १ आॅगस्ट दरम्यान आंदोलनाच्या काळात राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसवर दगडफेक तसेच काही ठिकाणी लालपरी व शिवशाही बसेस जाळण्याचे प्रकार घडले. त्यामुळे हिंसक परिस्थिती असलेल्या भागात वातावरण निवळण्यापर्यंत बससेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे बस आणि प्रवाशांचे नुकसान टळले. परंतू आंदोलन काळात जवळपास ६ हजार ४६१ बस फेºया रद्द कराव्या लागल्या. त्यामुळे ६ लाख २८ हजार ७८५ किलोमीटर इतक्या धावणाºया बसफेºया होऊ शकल्या नाहीत. परिणामी १२ दिवसात होणारे बीड विभागाचे १ कोटी ८३ लाख ३० हजार ९९८ रुपयांचे अपेक्षित उत्पन्न बुडाले.
९ दिवस परभणी बससेवा बंद
बारा दिवसात काही दिवस पूणे, औरंगाबाद, जालना, सोलापूर मार्गावरील बससेवा बंद ठेवावी लागली तर परभणी, नांदेड मार्गावरील बससेवा सलग नऊ दिवस बंद ठेवावी लागली.

Web Title: Beed: Rs 1.83 crore strike in ST in 12 days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.