बीड शहरातील विद्यार्थ्यांनाही मिळणार डाळीसह कडधान्य - A - A

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 05:00 AM2021-03-13T05:00:48+5:302021-03-13T05:00:48+5:30

शासनाकडून दखल : २० दिवसांत पुरवठ्याचे आदेश, शिक्षण विभाग मात्र सुस्त लोेकमत इम्पॅक्ट अनिल भंडारी बीड : शालेय पोषण ...

Beed students will also get pulses along with pulses - A - A. | बीड शहरातील विद्यार्थ्यांनाही मिळणार डाळीसह कडधान्य - A - A

बीड शहरातील विद्यार्थ्यांनाही मिळणार डाळीसह कडधान्य - A - A

Next

शासनाकडून दखल : २० दिवसांत पुरवठ्याचे आदेश, शिक्षण विभाग मात्र सुस्त

लोेकमत इम्पॅक्ट

अनिल भंडारी

बीड : शालेय पोषण आहारांतर्गत केंद्रीय स्वयंपाकगृह असलेल्या बीड शहरातील ७६ शाळांमधील १८ हजार विद्यार्थ्यांना आता तांदळासोबतच एक कडधान्य व एक डाळ प्रमाणानुसार वाटप करण्यात येणार आहे. मात्र, या संदर्भात ५ मार्चपर्यंत प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश असताना, ८ मार्चपर्यंत ठोस हालचाली झालेल्या नव्हत्या. ‘लोकमत’ने ग्रामीण, शहरी भेदभाव कशाला, असा प्रश्न मांडत शहरातील शाळांमधील विद्यार्थ्यांनाही कडधान्य, डाळीचे वाटप व्हावे, अशी पालकांची बाजू मांडत वृत्त दिले होते. १ मार्च रोजी राज्याच्या शालेय पोषण आहार योजना विभागाने केंद्रीय स्वयंपाकगृह प्रणालीमध्ये समाविष्ट असलेल्या शाळांमधील विद्यार्थ्यांना धान्य वितरणाबाबत निर्देश दिले आहेत.

केंद्र शासनाच्या निर्देशानुसार धान्यवाटप करण्यासाठी महाराष्ट्र स्टेट को-ऑप. कंझ्युमर्स फेडरेशनची निवड करण्यात आली.

मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने १६ फेब्रुवारी, २१ रोजी दिलेल्या आदेशाप्रमाणे विद्यार्थ्यांना लवकरात लवकर योजनेचा लाभ देण्याच्या दृष्टीने पुरवठादाराकडे मागणी नोंदवून विशिष्ट कालमर्यादेमध्ये ही प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश आहे.

सेंट्रल किचनशेडमुळे बीड शहरातील ७६ शाळांच्या विद्यार्थ्यांना केवळ तांदूळच वितरित होता. या संदर्भात पालकांनी तक्रारी केल्या होत्या, तसेच शासनाकडे पाठपुरावा केला जात होता. अखेर शासनाने दखल घेत, संबंधित शाळांच्या विद्यार्थ्यांना कडधान्य व डाळ वाटपाचे निर्देश दिले. २० दिवसांच्या आत हे धान्य थेट शाळांपर्यंत वितरणाच्या सूचना आहेत. कार्य दिनाच्या वेळेत धान्यवाटप न झाल्यास पुरवठादारावर दंडात्मक कारवाईचे निर्देश आहेत.

--------

सेंट्रल किचनशेड अंतर्गत असलेल्या शाळांमधील विद्यार्थ्यांना शासन निर्देशानुसार, तांदळाचे टप्प्याटप्प्याने आतापर्यंत वाटप केले आहे, अजूनही सुरू आहे. आता डाळ व कडधान्याचे वाटप होणार आहे. काय वाटप होणार, हे अद्याप ठरलेले नाही.

- अजय बहीर, अधीक्षक, शालेय पोषण आहार याेजना बीड

--------------------

कडधान्य व डाळीची निवड करण्यासाठी समिती गठित करण्याचे निर्देश असून, ३ मार्च राेजी बैठक घेऊन स्थानिक परिस्थितीनुसार विद्यार्थ्यांची आवड, डाळी व कडधान्यामधील पोषण तत्त्वे या बाबी विचारात घेऊन एक डाळ व एका कडधान्याची निवड करण्याबाबत निर्देश दिलेले होते. त्यानुसार, ६ मार्च रोजी बीड येथील केंद्रीय स्वयंपाकगृह असलेल्या शाळांतील विद्यार्थ्यांना हरभरा व तूरडाळ वितरणाबाबतचे आदेश देण्यात आल्याचे सूत्रांकडून समजले. मात्र, याबाबत शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांकडून स्पष्ट उत्तरे मिळाली नाहीत. वेळेत प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक असताना, संथगतीने कार्यवाही होत असल्याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे. मात्र, हरभरा, तूरडाळीचे आदेश बदलण्याचा घाट घातला तर जात नाही ना, अशी शंका व्यक्त होत आहे.

------------

जून, २०२० ते एप्रिल, २०२१ या कालावधीतील २२२ दिनांच्या खर्च मर्यादेमध्ये धान्याचा लाभ देण्याचे निर्देश आहेत. पहिली ते पाचवी वर्गातील प्रति विद्यार्थ्यांस ६ किलो, तर सहावी ते आठवीतील प्रति विद्यार्थ्यांस ९ किलो याप्रमाणे धान्यपुरवठा होणार आहे.

-------------

सेंट्रल किचनशेड अंतर्गत बीड शहरातील शाळा - ७६ लाभार्थी विद्यार्थी - १८,०००

------------

===Photopath===

080321\244253272322082_bed_17_08032021_14.jpeg

===Caption===

लोकमतने दिलेले वृत्त

Web Title: Beed students will also get pulses along with pulses - A - A.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.