बीडचे पोलीस अधीक्षक आर. राजा यांना राष्ट्रपती पदक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 08:21 AM2021-02-05T08:21:04+5:302021-02-05T08:21:04+5:30
बीड : येथील पोलीस अधीक्षक आर. राजा यांना सोमवारी राष्ट्रपती पदक जाहीर झाले. गडचिरोली येथे त्यांनी तीन नक्षलवाद्यांचा खात्मा ...
बीड : येथील पोलीस अधीक्षक आर. राजा यांना सोमवारी राष्ट्रपती पदक जाहीर झाले. गडचिरोली येथे त्यांनी तीन नक्षलवाद्यांचा खात्मा केला होता. त्यांच्या या शौर्याबद्दल त्यांना राष्ट्रपती पदक घोषित झाले आहे. पोलीस दलात स्वत:च्या जीवाची पर्वा न करता शौर्य गाजविणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने विविध पदकांनी गौरविण्यात येते. राष्ट्रपती पदकासाठी पोलीस अधीक्षक आर. राजा यांची निवड झाली. त्यामुळे बीड जिल्हा पोलीस दलाची मान उंचावली आहे. दरम्यान, २०१८ मध्ये ते गडचिरोली येथे अपर अधीक्षक म्हणून कार्यरत होते. तेथील सिरोंचा येथे नक्षलवादी व पोलिसांच्यात चकमक झाली होती. त्यात पोलिसांच्या पथकाने तिघांना ठार केले होते. त्याचीच दखल घेऊन आर. राजा यांना राष्ट्रपती पदक जाहीर झाले आहे.