बीडमध्ये रंगरेषेच्या भावविश्वात रमले शहरातील तीनशेवर चिमुकले !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2018 01:00 AM2018-01-02T01:00:11+5:302018-01-02T01:00:28+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क बीड : येथील स्व.झुंबरलाल खटोड सामाजिक प्रतिष्ठानच्या १४ व्या राज्यस्तरीय कीर्तन महोत्सवात सोमवारी सकाळच्या सत्रात स्व.शक्तीकुमार ...

Beed thriller in the city of Ramale city three hundred! | बीडमध्ये रंगरेषेच्या भावविश्वात रमले शहरातील तीनशेवर चिमुकले !

बीडमध्ये रंगरेषेच्या भावविश्वात रमले शहरातील तीनशेवर चिमुकले !

googlenewsNext
ठळक मुद्देराज्यस्तरीय कीर्तन महोत्सवात रंगली चित्रकला-पोस्टर स्पर्धा

लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : येथील स्व.झुंबरलाल खटोड सामाजिक प्रतिष्ठानच्या १४ व्या राज्यस्तरीय कीर्तन महोत्सवात सोमवारी सकाळच्या सत्रात स्व.शक्तीकुमार केंडे यांच्या स्मरणार्थ शक्ती प्रतिष्ठान आणि स्व.झुंबरलाल खटोड सामाजिक प्रतिष्ठानच्या संयुक्त विद्यमाने पहिली ते सातवी या बालगटासाठी, तसेच आठवी ते बारावी या माध्यमिक गटासाठी चित्रकला व पोस्टर्स स्पर्धा घेण्यात आल्या. सहभागी विद्यार्थ्यांनी आपल्या आवडत्या विषयावर हळुवार कुंचल्यातून रंगरेषाच्या माध्यमातून भावविश्व साकारले.
कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी प्रतिष्ठानचे अध्यक्ष गौतम खटोड, सचिव सुशील खटोड, संयोजक भरतबुवा रामदासी महाराज, शक्ती प्रतिष्ठानचे अध्यक्ष अक्षय केंडे, सचिव मंगलाताई केंडे, माजी मुख्याध्यापक हंसराज पवार, मुख्याध्यापक जे.बी. कुलकर्णी, संयोजक एस.एस. क्षीरसागर, प्रा.श्रीकांत पुरी यांच्यासह जाधव, संजय चौसाळकर, डॉ.विजय क्षीरसागर, सुहास पालीमकर, लक्ष्मीकांत खडकीकर, गणेश स्वामी, केदारनाथ बहिरमल, सुजीत गिराम, शुभम खटोड, आशिष खटोड, महेंद्र बुंदेले, धर्मराज मागदे, संतोष गायकवाड आदी उपस्थित होते.
या स्पर्धेत आदर्श माध्यमिक विद्यालय, गीता कन्या विद्यालय, गुरुकुल इंग्लिश स्कुल, मिल्लिया हायस्कुल, आदर्श विद्यालय, राष्ट्रीय माध्यमिक विद्यालय, बापुजी सांळुके विद्यालय, राष्ट्रीय प्राथमिक विद्यालय, संस्कार विद्यालय आणि चंपावती विद्यालयाचे बाल व माध्यमिक गटातील ३०० विद्यार्थी सहभागी झाले.

या विषयावर रेखाटले चित्र
पोस्टर व चित्रकला स्पर्धेत बालगटासाठी देशी गाय, माझी शाळा, आणि निसर्ग चित्र हे विषय ठेवण्यात आले, तर माध्यमिक गटासाठी माङया स्वप्नातील सुंदर बीड शहर, झाडे लावा, झाडे जगवा, कॅरिबॅगचे दुष्परिणाम, तसेच उच्च माध्यमिक गटासाठी भ्रष्टाचार भारत देशासाठी शाप, मुलाला मुलगी मिळणार नाही एक समस्या, व्यसनाधीन तरु ण पिढी हे विषय होते. सकाळी १० ते १ या वेळेत या स्पर्धा कीर्तन सभामंडपात पार पडल्या.
आज राष्ट्रसंत गोविंददेव गिरीजी यांचे कीर्तन
मंगळवार (दि. २) राष्ट्रसंत स्वामी श्री गोविंददेव गिरीजी महाराज यांचे सायंकाळी ६ ते ८ यावेळेत ‘तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार’ या विषयावर प्रवचन होणार आहे. याप्रसंगी उपस्थित रहावे असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

Web Title: Beed thriller in the city of Ramale city three hundred!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.