बीड जि.प. अध्यक्षपदाची उद्या निवडणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2020 12:23 AM2020-01-03T00:23:10+5:302020-01-03T00:24:07+5:30

येथील जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपद व उपाध्यक्ष पदाची निवडणूक ४ जानवारी रोजी होत असून जिल्हा परिषदेची सत्ता पुन्हा राखण्यासाठी भाजपने ताकद लावली असलीतरी राज्यातील सत्ताबदलामुळे राष्टÑवादी कॉँग्रेसनेही हालचाली सुरु केल्या आहेत.

Beed ZP Presidential election tomorrow | बीड जि.प. अध्यक्षपदाची उद्या निवडणूक

बीड जि.प. अध्यक्षपदाची उद्या निवडणूक

googlenewsNext
ठळक मुद्देनिवडीत चुरस : भाजप, राष्टÑवादीची मोर्चेबांधणी, शिवसेना सदस्यांचा राहणार प्रभाव

लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : येथील जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपद व उपाध्यक्ष पदाची निवडणूक ४ जानवारी रोजी होत असून जिल्हा परिषदेची सत्ता पुन्हा राखण्यासाठी भाजपने ताकद लावली असलीतरी राज्यातील सत्ताबदलामुळे राष्टÑवादी कॉँग्रेसनेही हालचाली सुरु केल्या आहेत. तर शिवसेनेकडे चार सदस्य असल्याने जिल्हा परिषद अध्यक्ष पदाच्या निवडणूकीत या सदस्यांचा प्रभाव राहणार आहे. हे सदस्य जिकडे वळतील त्या पक्षाचा, गटाचा अध्यक्ष होणार आहे.
विधानसभा निवडणूकीत भाजपचा चार मतदार संघात पराभव झाल्याने बीड जिल्हा परिषदेत भाजपला सत्ता कायम ठेवायची आहे. मात्र यासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे. मागील अडीच वर्षाच्या कार्यकाळात उपाध्यक्षपद चार सदस्य असलेल्या शिवसंग्रामकडे होते. नंतर जयश्री राजेंद्र मस्के व अन्य तीन सदस्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. तर शिवसेनेचे चार सदस्य असताना सभापतिपदावरच थांबावे लागले होते.
त्यामुळे यंदा शिवसेना ठोस भूमिका घेण्याची शक्यता आहे. अध्यक्षपदासाठी अद्याप अधिकृत नावे जाहीर झाली नसलीतरी भाजप व राष्टÑवादी काँग्रेसने मोर्चेबांधणी केली आहे.
५३ सदस्यांमधून होणार निवडणूक
जिल्हा परिषदेतील ६० पैकी पाच सदस्यांचे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे. विधानसभा निवडणूकीत विजयी झालेले संदीप क्षीरसागर आणि बाळासाहेब आजबे यांच्या राजीनाम्यामुळे राष्टÑवादी कॉँग्रेसकडील दोन सदस्य कमी झाले आहेत. त्यामुळे ५३ सदस्यांतून निवडणूक होईल
आता राष्टÑवादी कॉँग्रेसचे १९, कॉँग्रेस ३, भाजपा १९, शिवसंग्रामचे ४, शिवसेनेचे ४, काकू - नाना आघाडीचे २, अपक्ष २ असे बलाबल आहे. शिवसंग्रामचे चारही सदस्य सध्या भाजपवासी झाले आहेत.
मागील निवडीत शिवसेनेने भाजपला मदत केली होती. आता सत्ताबदलामुळे या सदस्यांची भूमिका राज्याच्या समिकरणाकडे की, जिल्ह्याच्या समिकरणाकडे राहील हे पहायला मिळणार आहे.

Web Title: Beed ZP Presidential election tomorrow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.