विभागीय शालेय तायक्वांदो स्पर्धेत बीडच्या २१ खेळाडूंना सुवर्णपदके
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2018 07:47 PM2018-10-19T19:47:37+5:302018-10-19T19:48:08+5:30
विभागीय तायक्वांदो क्रीडा स्पर्धेत बीडच्या २१ खेळाडूंनी स्पर्धेत प्रथम क्रमांकासह सुवर्णपदके जिंकली.
बीड : येथील जिल्हा क्रीडा संकुलात पार पडलेल्या विभागीय तायक्वांदो क्रीडा स्पर्धेत बीडच्या २१ खेळाडूंनी स्पर्धेत प्रथम क्रमांकासह सुवर्णपदके जिंकली. या स्पर्धेत बीड, औरंगाबाद, जालना, परभणी व हिंगोली जिल्ह्यातील खेळाडूंनी सहभाग नोंदवला. मुलांच्या गटात यजमान बीडच्या खेळाडूंचा तर मुलींच्या गटात औरंगाबाद खेळाडूंचा दबदबा राहिला .
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय बीड , जिल्हा क्रीडा परिषद बीड व तायक्वांदो असोशिएशन आॅफ बीड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विभागीय शालेय तायक्वांदो स्पर्धा बीड जिल्हा क्रीडा संकुल येथे तीन दिवस पार पडली. स्पर्धेसाठी दिनेश लिंबेकर, जिल्हा क्रीडा अधिकारी अरविंद विद्यागर, इंजि. घोलप, जिल्हा तायक्वांदो संघटनेचे सचिव अविनाश बारगजे, क्रीडा मार्गदर्शक संतोष वाबळे, बन्सी राऊत, शामराव डाके आदींची प्रमुख उपस्थिती होती. अभिषेक शिंदे, स्वप्निल हुरकुडे , पारस गुरखुदे, नयन बारगजे, साक्षी लंबाटे, गौरी काळे, मदुरा नवले, प्रांजल मुनोत, समृद्धी भाकरे, पुर्वा मुंदडा, सोनिया यमपुरे, देवेंद्र जोशी, अक्षय पहुणे, देवांश हिरण, सोहम शेकडे, पुजा जाधव, पायल जाधव, भाग्यश्री जाधव, आकाश भुसारी, गौरव नवसुपे, अभिषेक राऊत अशी यशस्वी खेळाडूंची नावे आहेत. या सर्वांची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाल्याचे अविनाश बारगजे यांनी सांगितले. पंच म्हणून अविनाश पांचाळ, जया बारगजे, सचिन जायभाये, सचिन कातांगळे, सुशांत सोन्नर, शशांक साहू (बीड), गोरक्ष गालम (अहमदनगर), राष्ट्रपाल नरावडे (नांदेड), लता कलवार, प्रविण वाघ, आशिष बनकर (औरंगाबाद) आदींनी काम पाहीले.
नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर, जिल्हा क्रीडा अधिकारी अरविंद विद्यागर, प्रा.राजेश क्षीरसागर, नितिनचंद्र कोटेचा, अविनाश बारगजे, जया बारगजे, सुनिल राऊत, दिनकर चौरे, भारत पांचाळ, मनेश बनकर, बन्सी राऊत, विनोदचंद्र पवार, प्रा. पी टी चव्हाण, श्रीकांत थोरात, शशांक साहू आदिंली खेळाडूंचे स्वागत केले.