बीडच्या पहिल्या आमदार शांताबाई कोटेचा यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2021 04:38 AM2021-08-21T04:38:46+5:302021-08-21T04:38:46+5:30

बीड शहरात वैद्यकीय सेवा देणाऱ्या डॉ. शांताबाई यांच्यावर लहानपणापासूनच गांधीवादी विचारांचा पगडा होता. स्वातंत्र्यपूर्व काळापासून डॉ. शांताबाई व रतनलाल ...

Beed's first MLA Shantabai Kotecha passes away | बीडच्या पहिल्या आमदार शांताबाई कोटेचा यांचे निधन

बीडच्या पहिल्या आमदार शांताबाई कोटेचा यांचे निधन

बीड शहरात वैद्यकीय सेवा देणाऱ्या डॉ. शांताबाई यांच्यावर लहानपणापासूनच गांधीवादी विचारांचा पगडा होता.

स्वातंत्र्यपूर्व काळापासून डॉ. शांताबाई व रतनलाल कोटेचा यांनी समाजकार्यात झोकून दिले. १९४२मध्ये इंग्रजांविरूद्धच्या चले जाव आंदोलनात सक्रिय सहभाग नोंदवलेल्या डॉ. शांताबाई कोटेचा यांना शिक्षा भोगावी लागली. १९५२मध्ये नगर परिषदेची निवडणूक जिंकल्यानंतर त्या राजकारणात सक्रिय झाल्या. १९५७च्या विधानसभा निवडणुकीत त्या काँग्रेसच्या तिकिटावर बीडच्या प्रथम आमदार झाल्या. सामाजिक सेवा, दातृत्त्वाबद्दल त्यांची आठवण बीडकरांना कायम स्मरणात राहणार आहे.

---

डॉ. शांताबाई कोटेचा या आधीपासूनच सामाजिक चळवळीत सक्रिय राहिल्या. आम्ही विद्यार्थीदशेत असताना त्या निवडून आल्यानंतर निघालेली विजयी मिरवणूक बलभीम चौक ते माळीवेसपर्यंत पाहिली होती. तर बीड शहरातील ए. एच. वाडिया वाचनालयाला आपली संपूर्ण ग्रंथसंपदा अल्मारीसह देत त्यांनी मोठे दातृत्व दाखवल्याची आठवण डॉ. रमाकांत निर्मळ यांनी सांगितली.

--------

------------

200821\20_2_bed_18_20082021_14.jpeg

शांताबाई कोटेचा

Web Title: Beed's first MLA Shantabai Kotecha passes away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.