बीडच्या राजकारणात मोठा उलटफेर; जयदत्त क्षीरसागरांना ठाकरे गटाने शिवसेनेतून केले बेदखल

By सोमनाथ खताळ | Published: October 22, 2022 04:39 PM2022-10-22T16:39:25+5:302022-10-22T16:42:01+5:30

बीड जिल्ह्याचे संपर्कप्रमुख, जिल्हाप्रमुखांकडून भूमिका स्पष्ट

Beed's leader Jayadutt Kshirsagar has no connection with Shiv Sena; Uddhav Thackeray group announced | बीडच्या राजकारणात मोठा उलटफेर; जयदत्त क्षीरसागरांना ठाकरे गटाने शिवसेनेतून केले बेदखल

बीडच्या राजकारणात मोठा उलटफेर; जयदत्त क्षीरसागरांना ठाकरे गटाने शिवसेनेतून केले बेदखल

Next

बीड : माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर आणि शिवसेनेचा (उद्धव ठाकरे गट) यांचा कसलाही संबंध नाही. आता यापुढे आम्ही स्वतंत्र निवडणूका लढणार नाही, अशी भूमिका संपर्क प्रमुख धोंडू पाटील आणि जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांनी घेतली. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केल्यानंतर आम्ही हा निर्णय घेतल्याचे जगताप यांनी सांगितले. 

माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर हे आतापर्यंत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत होते. परंतू मागील काही महिन्यांपासून ते त्यांच्यापासून अंतर ठेवून होते. शिवसेनेचे वरिष्ठ पदाधिाकरी आले किंवा कार्यक्रमातही त्यांची गैरहजेरी होती. तसेच कोणत्या कार्यक्रमालाही शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना निमंत्रण देत नव्हते. दोन दिवसांपूर्वीच झालेल्या विविध रस्ता कामांच्या उद्घाटन कार्यक्रमाला बीडमधील पदाधिकाऱ्यांना तर सोडाच परंतू पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना बाजूला सारून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने करण्यात आले. त्यामुळे क्षीरसागर नेमके कोणाचे? याबाबत संभ्रम होता. 

या सर्व प्रकाराची माहिती संपर्क प्रमुख धोंडू पाटील आणि जिल्हा प्रमुख अनिल जगताप यांनी उद्धव ठाकरे यांना मातोश्रीवर जावून कळवली. यावर त्यांनी क्षीरसागरांचा पक्षाशी काहीही संबंध ठेवू नका, असे आदेश बीड शिवसेनेला दिले. त्याप्रमाणे जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांनी पत्रकार परिषद घेऊन ही घोषणा केली. यावेळी जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधव, माजी जिल्हाप्रमुख बाळासाहेब पिंगळे आदींची उपस्थिती होती.

Web Title: Beed's leader Jayadutt Kshirsagar has no connection with Shiv Sena; Uddhav Thackeray group announced

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.