बीडच्या अल्पवयीन मुलीवर फेसबुक फ्रेंडचा कोल्हापुरात अत्याचार; परिसरात खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2022 11:40 AM2022-05-29T11:40:56+5:302022-05-29T11:45:01+5:30
बीड - बीडमधील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बीडमध्ये राहणाऱ्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, ...
बीड- बीडमधील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बीडमध्ये राहणाऱ्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची माहिती समोर आली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, बीड ग्रामीण ठाणे हद्दीतील १६ वर्षीय मुलीची वर्षभरापूर्वी समद महंमद तहसीलदार (१९,रा.खेबळी, ता.गडहिंग्लज, जि.कोल्हापूर) याच्याशी ओळख झाली. त्याच्या प्रेमात वाहवत गेलेली मुलगी २४ मे रोजी घरात कोणाला न सांगता बीडहून कोल्हापूरला गेली. तेथील आग्रा येथे २५ मे रोजी एका बंद स्थितीतील विश्रामगृहात त्या दोघांनी मुक्काम केला. यावेळी समद तहसीलदारने तिच्यावर अत्याचार केला. दरम्यान, २६ रोजी सकाळी त्या दोघांना स्थानिकांनी पकडून पोलिसांना पाचारण केले. त्यानंतर खरा प्रकार उघडकीस आला. बीड ग्रामीण ठाण्यात मुलीच्या नातेवाईकांच्या तक्रारीवरून अज्ञात आरोपीवर अपहरणाचा गुन्हा नोंद होता.
आरोपीसह पीडितेला घेऊन पथक बीडमध्ये
मुलगा व मुलगी कोल्हापुरात सापडल्याची माहिती मिळाल्यावर बीड ग्रामीण ठाण्याचे पो.नि. संतोष साबळे, सहायक निरीक्षक योगेश उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.ना.ए.बी.गायकवाड, किशोर राऊत हे २७ मे रोजी कोल्हापूरला गेले. तेथून त्या दोघांना घेऊन ते २८ रोजी बीडला पोहोचले. अपहरणाच्या गुन्ह्यात बलात्कार व बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कलम वाढविले असून तपास पिंक मोबाइल पथकाच्या उपनिरीक्षक मीना तुपे करत आहेत.