बीडच्या खासदाराचा आज फैसला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2019 12:16 AM2019-05-23T00:16:10+5:302019-05-23T00:17:16+5:30
बीड लोकसभा मतदारसंघाच्या मतमोजणीस गुरुवारी सकाळी आठ वाजता प्रारंभ होईल. उमेदवारांची संख्या जास्त आणि व्हीव्हीपॅटची मतमोजणी करावी लागणार असल्यामुळे अंतिम निकाल जाहीर होण्यास उशीर होणार असला तरी दुपारी दोन वाजेपर्यंत मतदानाचा कल स्पष्ट होईल.
सतीश जोशी।
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : बीड लोकसभा मतदारसंघाच्या मतमोजणीस गुरुवारी सकाळी आठ वाजता प्रारंभ होईल. उमेदवारांची संख्या जास्त आणि व्हीव्हीपॅटची मतमोजणी करावी लागणार असल्यामुळे अंतिम निकाल जाहीर होण्यास उशीर होणार असला तरी दुपारी दोन वाजेपर्यंत मतदानाचा कल स्पष्ट होईल.
बीड लोकसभा मतदारसंघात भाजपच्या डॉ. प्रीतम मुंडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे बजरंग सोनवणे, वंचित बहुजन आघाडीचे विष्णू जाधव यांच्यासह ३६ उमेदवार हे रिंगणात उतरले होते. शहरातील कुर्ला रोडवरील कृषी उत्पन्न बाजार समितीत सकाळी ८ वाजता मतमोजणीस प्रारंभ होईल. सर्वप्रथम टपाली मतदान मोजले जाईल. प्रत्येक विधानसभानिहाय १४ टेबलवर म्हणजे एकूण ८४ टेबलवर ही मतमोजणी होणार आहे. बीड, माजलगाव, गेवराई, आष्टी, केज आणि परळी अशा सहा विधानसभा मतदारसंघातील एकूण ८४ मतदान केंद्रांवरील ईव्हीएम मशीन मोजणीस घेण्यात येणार असून, या ८४ ईव्हीएमच्या मतमोजणीची एक फेरी असेल. अशा एकूण ३२ फेऱ्या होतील. गेवराई, बीड, माजलगाव, परळीची मतमोजणी २९ फेºयातच संपेल. गेवराईमध्ये ३९६ मतदान केंद्रे (२९ फेºया), माजलगाव - ३७४ (२७ फेºया), बीड - ३७१ (२७ फेºया), आष्टी - ४३८ (३२ फेºया), केज - ४०७ (२९ फेºया) आणि परळी विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्रांची संख्या ३३९ असून, २५ फेºया होतील. एकूण २३२५ मतदान केंद्रे आहेत.