बीडच्या नयन बारगजेची किक लयभारी; तायक्वांदोच्या आंतरराष्ट्रीय खेळात पटकावले कांस्यपदक

By सोमनाथ खताळ | Published: September 27, 2022 06:30 PM2022-09-27T18:30:10+5:302022-09-27T18:31:36+5:30

शासनाचे शिवछत्रपती पुरस्कार विजेते प्रविण बोरसे, लाला भिल्लारे , प्रविण सोंनकुल, डॉ. अविनाश बारगजे व अमोल तोडणकर यांनी या खेळाडूंना मार्गदर्शन केले.

Beed's Nayan Bargaje's kick won medal; Won Bronze Medal in Taekwondo International Games | बीडच्या नयन बारगजेची किक लयभारी; तायक्वांदोच्या आंतरराष्ट्रीय खेळात पटकावले कांस्यपदक

बीडच्या नयन बारगजेची किक लयभारी; तायक्वांदोच्या आंतरराष्ट्रीय खेळात पटकावले कांस्यपदक

googlenewsNext

बीड : जागतिक तायक्वांदो अंतर्गत नेपाळ तायक्वांदो महासंघ आयोजित जी -२ रॅंकींग ३ री माऊंट एव्हरेस्ट आंतरराष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धा पोखरा येथे झाली. यात बीडच्या नयन अविनाश बारगजे हिने आपल्या खेळाने प्रेक्षकांची मने  जिंकली. एकापेक्षा एक किक मारून तिने गुणांची कमाई केली. प्रतिस्पर्ध्यावर मात करत तिने कांस्यपदकावर आपले नाव कोरले. तसेच या स्पर्धेत महाराष्ट्रातील खेळाडूंनी १ सुवर्ण, ४ रौप्य तर २ कांस्यपदकांची कमाई केली.

पोखरा ( नेपाळ) येथे २१ ते २६ सप्टेंबर २०२२ दरम्यान जी -२ रॅंकींग ३ री माऊंट एव्हरेस्ट आंतरराष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धा २०२२ पार पडली. या स्पर्धेत भारत, पाकिस्तान, दक्षिण कोरिया, अमेरिका, स्पेन, तुर्कस्तान, केनिया, नेपाळ, मलेशिया, हॉंगकॉंग, भुतान , श्रीलंका, बांगलादेश , ब्रम्हदेश आदी देशांतील खेळाडूंनी सहभाग नोंदवला. शिवम शेट्टी या महाराष्ट्राच्या खेळाडूने रोमहर्षक अंतिम सामन्यात पाकिस्तानच्या खेळाडूला पराभूत करून सुवर्णपदक जिंकले. गौरव भट, शिवानी भिल्लारे, शृतीका टकले व नॅन्सी यांनी ४ रौप्यपदकांवर नाव कोरले. बीडच्या नयन अविनाश बारगजे हिने ४६ किलो वजनी गटात कांस्यपदक पटकावले. नम्रता तायडे हीने देखील वरिष्ठ गटात कांस्यपदक जिंकले. शासनाचे शिवछत्रपती पुरस्कार विजेते प्रविण बोरसे, लाला भिल्लारे , प्रविण सोंनकुल, डॉ. अविनाश बारगजे व अमोल तोडणकर यांनी या खेळाडूंना मार्गदर्शन केले.

बीडचे माजी नगराध्यक्ष डॉ भारतभूषण क्षीरसागर, जिल्हा क्रीडा अधिकारी सुहासिनी देशमुख, अरविंद विद्यागर, विनायक गायकवाड, प्रा. डॉ. राजेश क्षीरसागर, जिल्हा असोसिएशनचे अध्यक्ष नितीनचंद्र कोटेचा, दिनकर चौरे, राष्ट्रीय तायक्वांदो प्रशिक्षक डॉ.अविनाश बारगजे, जया बारगजे, बन्सी राऊत, भरत पांचाळ, सुभाष पोठरे, डॉ विनोद पवार, सचिन जायभाये, डॉ शकील शेख, उज्वल गायकवाड, नवीद शेख, सचिन कातांगळे, अनिस शेख ,अमित मोरे, प्रसाद साहू, नितीन आंधळे, बालाजी कराड, कृष्णा उगलमुगले व आदित्य भंडारे आदींनी त्यांचे स्वागत केले.

Web Title: Beed's Nayan Bargaje's kick won medal; Won Bronze Medal in Taekwondo International Games

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Beedबीड