बीडच्या चोरट्यांची चोरीच्या दुचाकी विकून मिळालेल्या पैशांवर पुणे, मुंबईत ‘ऐश’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2019 07:23 PM2019-01-24T19:23:51+5:302019-01-24T19:26:57+5:30

दोन अट्टल दुचाकी चोरांच्या मुसक्या आवळत त्यांच्याकडून तब्बल २० दुचाकी जप्त केल्या आहेत.

Beed's thefts 'Enjoy' in Pune, Mumbai, on the money received from stolen bikes | बीडच्या चोरट्यांची चोरीच्या दुचाकी विकून मिळालेल्या पैशांवर पुणे, मुंबईत ‘ऐश’

बीडच्या चोरट्यांची चोरीच्या दुचाकी विकून मिळालेल्या पैशांवर पुणे, मुंबईत ‘ऐश’

Next
ठळक मुद्देदोन चोरट्यांसह २० दुचाकी जप्त एलसीबी, विशेष पथकाची कारवाई

बीड : बीड, लातुर जिल्ह्यातून दुचाकी चोरून त्या पुण्यात नेवून विक्री करायच्या. मिळालेल्या पैशांवर मग पुणे, मुंबईमध्ये जावून ऐश करायची. मागील दोन महिन्यांपासून सुरू असलेला हे खेळ  पोलिसांनी बंद पाडला आहे. दोन अट्टल दुचाकी चोरांच्या मुसक्या आवळत त्यांच्याकडून तब्बल २० दुचाकी जप्त केल्या आहेत. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस अधीक्षक जी.श्रीधर यांच्या विशेष पथकाने संयुक्तरित्या केली.

सुशांत रामनाथ मुंडे (२१ रा.साळींबा ता.वडवणी) व महेश (अल्पवयीन असल्याने नाव बदलले) अशी पकडलेल्या दुचाकी चोरांची नावे आहेत. टोळीचा म्होरक्या व अन्य एकजण अद्यापही फरार आहे. मागील दोन महिन्यांपासून त्यांनी बीड जिल्ह्यात धुमाकूळ घातला होता. दिवसेंदिवस दुचाकी चोरीच्या घटना वाढत असल्याने स्थानिक गुन्हे शाखेने तपास गतीने सुरू केला. पोलीस निरीक्षक घनश्याम पाळवदे यांना हे चोरटे केज तालुक्यात असल्याचे समजले. त्यांनी तात्काळ सपोनि अमोल धस आणि पोउपनि आर.ए.सागडे यांना आदेश देत तपासाला पाठविले. त्यांनीही दोन चोरट्यांना केज-धारूर रोडवर पाठलाग करून ताब्यात घेतले. त्यांना अंबाजोगाई शहर पोलिसांच्या स्वाधीन केले जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक जी.श्रीधर, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, अजित बोºहाडे, एलसीबीचे पोनि घनश्याम पाळवदे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि अमोल धस, विशेष पथकाचे प्रमुख पोउपनि आर.ए.सागडे, सपोनि अमोल धस, गलधर, बालाजी दराडे, गणेश दुधाळ, सखाराम पवार, साजीद पठाण, राजु वंजारे, हराळ, पांडूरंग देवकते, गणेश नवले, अंकुश वरपे, रेवननाथ दुधाने, जयराम उबे आदींनी केली आहे.

१५ गुन्हे उघड
पुणे, हाडपसर, स्वारगेटसह बीड जिल्ह्यातील सिरसाळा, अंबाजोगाई शहर, धारूर, परळी शहर, परळी ग्रामीण, वडवणी व लातुर जिल्ह्यातील जवळपास १५ गुन्हे उघडकीस आले आहेत. अद्यापही पोलिसांकडून दुचाकींचा शोध घेतला जात आहे. आणखी गुन्हे उघड येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

दुचाकी चोरांची टोळी सक्रिय
सुशांत, महेशसह अन्य दोघे अशी चौघांची टोळी आहे. मागील दोन महिन्यापासून ही टोळी बीड जिल्ह्यात सक्रिय होती. टोळीतील दोघांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले आहे. अद्यापही टोळीचा म्होरक्या फरार आहे. लवकरच इतर दोघांना अटक करू, असे पोलिसांकडून सांगण्यात आले.

शिक्षण नको, मौज करायला पाहिजे...
सुशांत व महेश यांना शिक्षणाची आवड नाही. घरची परिस्थिती चांगली असतानाही त्यांनी शिक्षणाकडे दुर्लक्ष केले. वाईट मित्रांच्या संगतीने ते गुन्हेगारीकडे वळले. मौज मस्ती करायला पैसे कमी पडत असल्याने त्यांनी दुचाकी चोरीचा मार्ग निवडला. सुरूवातीला यामध्ये यशस्वी झाले. मात्र पोलिसांच्या तावडीतून ते वाचू शकले नाहीत.

Web Title: Beed's thefts 'Enjoy' in Pune, Mumbai, on the money received from stolen bikes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.