ग्रामीण भागात आंबे उतरविण्यास सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 04:33 AM2021-05-13T04:33:26+5:302021-05-13T04:33:26+5:30
वडवणी : गेल्या वर्षी अवकाळी पावसाने आंबा जास्त प्रमाणात आला नसल्याने या वर्षी मात्र आंब्यांनी चांगलाच बहर घेतला आहे. ...
वडवणी : गेल्या वर्षी अवकाळी पावसाने आंबा जास्त प्रमाणात आला नसल्याने या वर्षी मात्र आंब्यांनी चांगलाच बहर घेतला आहे.
सध्या ग्रामीण भागामध्ये आंबे उतरविण्यास सुरुवात झाली आहे. आंबा फळांचा राजा म्हणून संबोधला जातो. ही फळे उतरवून गवतात नैसर्गिकरीत्या पिकवून त्याची चव चाखण्यासाठी ग्रामीण भागात आता उत्सुकता लागली आहे. आंबे उतरविताना पाडाच्या आंब्याची चव चाखतानाही ग्रामीण भागातील नागरिकांना वेगळाच आनंद मिळत आहे. खुडी व पोहरीच्या साहाय्याने आंबे उतरताना दिसत आहेत. या वर्षी लॉकडाऊन असल्याने आंबा विकायला बाजारपेठा बंद असल्याने त्याचे काय करायचे, हाही मोठा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.
लॉकडाऊनच्या काळात मदतीचा ओघ मंदावला
वडवणी : गेल्या वर्षभरापासून देशासह महाराष्ट्रात कोरोनाने थैमान घातले आहे. गेल्या वर्षीपासून लॉकडाऊन पडल्याने छोटे-मोठे व्यापारी ज्यांचे हातावर पोट आहे अशा व्यावसायिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते. तरी यामध्ये गेल्या वर्षी वडवणी नगरपंचायतीची रणधुमाळी सुरू होईल असे वाटले असताना गेल्या वर्षी लॉकडाऊनच्या काळात अनेक राजकीय पुढाऱ्यांनी गरजूंना अन्नधान्य, किराणा, सॅनेटायजर, मास्क असे विविध प्रकारचे साहित्य वाटप करून नागरिकांना दिलासा दिला होता.
परंतु या वर्षीच्या लॉकडाऊनच्या काळात वडवणी नगरपंचायत निवडणूक लांबल्याने एकाही राजकीय पुढाऱ्याने गरजवंतांना मदत केल्याचे दिसले नाही.