ईटके यांच्या वतीने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 04:35 AM2021-07-30T04:35:07+5:302021-07-30T04:35:07+5:30
परळी : भाजप शहर उपाध्यक्ष तथा माजी नगरसेवक महादेव ईटके यांच्या वतीने चिपळूण येथील पूरग्रस्तांना मायेची उब म्हणून ...
परळी : भाजप शहर उपाध्यक्ष तथा माजी नगरसेवक महादेव ईटके यांच्या वतीने चिपळूण येथील पूरग्रस्तांना मायेची उब म्हणून ब्लँकेट पाठवण्यात आले. नैसर्गिक आपत्तीमध्ये सापडलेल्या कोकणातील पूरग्रस्तांना मदत म्हणून महादेव ईटके यांनी स्वखर्चाने ब्लँकेट पाठवले. यावेळी भाजपाचे ज्येष्ठ नेते तथा जवाहर शिक्षण संस्थेचे सचिव दत्ताप्पा ईटके गुरूजी, शहर अध्यक्ष जुगलकिशोर लोहिया यांच्या हस्ते परळी पोस्टाचे पोस्ट मास्तर पोटभरे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. यावेळी प्रदेश भाजप युवा मोर्चा सचिव अरुण पाठक, भाजप सरचिटणीस उमेश खाडे, राजेंद्र ओझा, माजी नगरसेवक कमलाकरअप्पा हरेगावकर, रमेश गायकवाड, नरेश पिंपळे, सुशील हंरुगुळे, राजेश कौलवार, योगेश पांडकर, विजय दहिवाळ, गोविंद चौरे, मंगेश स्वामी, अभिनंदन चौभाकर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अश्विन मोगरकर यांनी केले. विकास हालगे यांनी आभार मानले.
290721\img-20210726-wa0439_14.jpg