स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने जातेगाव फाट्यावर रास्ता रोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2019 12:19 AM2019-07-24T00:19:01+5:302019-07-24T00:19:42+5:30
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने मंगळवारी सकाळी ११.३० वाजता जातेगाव फाट्यावर एक तास रास्ता रोको आंदोलन केले.
गेवराई : तालुक्यातील जातेगाव व तलवाडा महसूल मंडळातील शेतकऱ्यांना सोयाबीनचा विमा नाकारला आहे. विमा कंपनीने भर दुष्काळात नुकसान झालेल्या शेतकºयांचा विमा नाकारुन शेतक-यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले आहे. हा विमा त्वरित मंजूर करून वाटप करावा, या मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने मंगळवारी सकाळी ११.३० वाजता जातेगाव फाट्यावर एक तास रास्ता रोको आंदोलन केले. या भागातील अनेक शेतकरी यात सहभागी होते. आंदोलनामुळे दुतर्फा गाड्यांची वाहतूक ठप्प झाली होती.
तालुक्यातील तलवाडा व जातेगाव महसूल मंडळातील शेतक-यांनी गतवर्षी मोठ्या प्रमाणात सोयाबीनचा पेरा केला होता. मात्र पावसाने हुलकावणी दिल्याने शेतक-यांचे नुकसान झाले. परंतु एवढा दुष्काळ असून, देखील विमा कंपनीने तलवाडा व जातेगाव परिसरातील शेतकºयांचा सोयाबीनचा विमा नामंजूर केला आहे. त्यामुळे शेतकºयांवर दुहेरी संकट कोसळले आहे.
या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या युवती प्रदेशाध्यक्ष पूजा मोरे यांच्या नेतृत्वालाखाली दोन्ही महसूल मंडळातील सोयाबीन उत्पादकांना तात्काळ विमा रक्कम मंजूर करु न वाटप करावी, या मागणीसाठी मंगळवारी सकाळी ११.३० वाजता राष्ट्रीय महामार्ग कल्याण -विशाखापट्टणम मार्गावरील जातेगाव फाटा येथे रास्ता रोको करण्यात आले.
यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मराठवाडा कार्याध्यक्ष गजानन बंगाळे, माणिक कदम, निवृत्त शेवाळे, अशोक मुटकुळे, वचिष्ठ बेडके, काशिनाथ चिकणे, सतीश मस्के, लिंबाजी पवार, कैलास पवार, श्ेख मुसा सह अनेक शेतकरी उपस्थित होते. रास्ता रोकोचे निवेदन तालुका कृषी अधिकारी संजय ढाकणे यांना देण्यात आले. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.