८० शाळांची घंटा वाजली, सोमवारपासून ४०० शाळा सुरू होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 04:24 AM2021-07-16T04:24:20+5:302021-07-16T04:24:20+5:30
कोरोनाची लाट पुरती ओसरत चालली असलीतरी काही ठिकाणी तुरळक प्रमाणात रुग्ण आढळत आहेत, तर काही गावांमध्ये शाळा सुरू करावी ...
कोरोनाची लाट पुरती ओसरत चालली असलीतरी काही ठिकाणी तुरळक प्रमाणात रुग्ण आढळत आहेत, तर काही गावांमध्ये शाळा सुरू करावी की नाही, याबाबतचा संभ्रम लवकरच दूर होणार असून, पालक शाळा सुरू करावी या मानसिकतेत आहेत. दरम्यान, १५ जुलै रोजी सुरू झालेल्या पाडळशिंगी, बीड येथील शाळांना माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी डॉ. विक्रम सारूक यांनी भेटी देऊन समाधान व्यक्त केले, तसेच अन्य अधिकाऱ्यांनी व गटशिक्षणाधिकाऱ्यांनी विविध ठिकाणच्या शाळांना भेटी दिल्या.
--------
४०० शाळा प्रस्तावित
गावातील शाळा सुरू करण्याबाबत पालकांशी चर्चा करून समित्यांनी तयारी केली आहे. ग्रामपंचायतींची ना हरकत मिळताच जिल्ह्यातील ४०० शाळा येत्या सोमवारपासून सुरू होऊ शकतील. शाळा सुरू करण्याबाबत पालक आणि ग्रामस्थ सकारात्मक आहेत.
-डॉ. विक्रम सारूक, शिक्षणाधिकारी (मा.)
---------
तालुकानिहाय सुरू झालेल्या शाळांची संख्या
वडवणी २, पाटोदा ०, अंबाजोगाई ८, गेवराई ९, आष्टी ०, माजलगाव ७, धारूर ९, केज १२, परळी १३, शिरूर २१, बीड ४.
-----------
पहिला दिवस मजेचा
सोळा महिन्यांनंतर शाळा सुरू झाल्याने विद्यार्थ्यांना आकाश मोकळे झाले होते. पहिला दिवस मित्रांची भेट, गप्पाटप्पा, मौजमस्तीत गेला. आता दररोज उपस्थिती लावून ते ज्ञानार्जन करणार आहेत.
----------
शाळा परिसरात गर्दी टाळावी, एका बाकावर एक विद्यार्थी, दोन बाकांमध्ये ६ फुटांचे अंतर ठेवावे, एका वर्गात १५- २० विद्यार्थी असावेत, साबणाने हात धुणे, मास्कचा वापर, शिक्षकांची राहण्याची व्यवस्था त्याच गावात करावी किंवा त्यांनी सार्वजनिक वाहतुकीचा वापर न करण्याबाबत दक्षता घ्यावी. शिक्षकांचे कोरोना प्रतिबंधक लसीकरण झालेले असावे, अशा सूचना आहेत.
-------
150721\15_2_bed_18_15072021_14.jpeg
निगमानंद विद्यालय