शासकीय योजनेतील लाभार्थ्यांना पूर्वीच्या बँक खात्यावर अनुदान द्यावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 04:23 AM2021-06-11T04:23:11+5:302021-06-11T04:23:11+5:30
बुधवारी अनुदानापासून वंचित लाभार्थ्यांना घेऊन पापा मोदी उपजिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचले. या विषयावर सकारात्मक चर्चा करून जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे निवेदन ...
बुधवारी अनुदानापासून वंचित लाभार्थ्यांना घेऊन पापा मोदी उपजिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचले. या विषयावर सकारात्मक चर्चा करून जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे निवेदन दिले.
संजय गांधी निराधार,श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन,इंदिरा गांधी वृद्धापकाळ निवृत्ती वेतन,राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन यासह शासनाच्या वतीने सुरू असलेल्या विविध योजनेतील विद्यमान लाभार्थींचे अनुदान मागील अनेक महिन्यांपासून प्रलंबित आहे. जिल्हाधिकारी बीड यांनी राष्ट्रीयीकृत बँकेत खाते असणाऱ्या लाभार्थ्यांना अनुदान देण्याबाबत आदेशित केले होते. त्यामुळे खासगी बँकांमध्ये,जिल्हा बँकेत खाते असणाऱ्या लाभार्थ्यांना अद्याप अनुदान मिळाले नाही. तर दुसरीकडे राष्ट्रीयीकृत बँका विविध शासकीय योजनेतील लाभार्थ्यांचे बँक खाती आपल्या बँकेत सुरू करण्यास किंवा उघडून देण्यास अनुकूल दिसत नाही. त्यामुळे या लाभार्थ्यांना त्यांच्या पूर्वीच्याच बँक खात्यात अनुदान रक्कम तत्काळ देण्याबाबत आदेशित करावेत. प्रशासनाला हे शक्य होत नसेल तर प्रत्येक तहसील कार्यालयातून या योजनेतील लाभार्थ्यांचे अनुदान नगदी रोख स्वरूपात देण्यात यावे, अशी मागणी निवेदनात केली आहे.
या निवेदनावर जिल्हाध्यक्ष राजकिशोर मोदी,महाराष्ट्र राज्य कापूस पणन व उत्पादक महासंघाचे उपाध्यक्ष अॅड. विष्णुपंत सोळंके,अंबाजोगाई शहराध्यक्ष महादेव आदमाने,नगरसेवक मनोज लखेरा,नगरसेवक अमोल लोमटे,सुनील व्यवहारे,राणा चव्हाण,सचिन जाधव,महेश वेदपाठक,अमोल मिसाळ यांच्यासह गोरोबा सरवदे,इदरसुल हक जहूल हक,इंदुबाई वाघमारे,जुलेखा शेख रशीद,दत्तू गायकवाड,ग्यानबा धबडगे,विजयमाला गायकवाड,सटवा खलसे,गयाबाई धुमाळ,कौशल्या खलसे आदी विविध योजनेतील लाभार्थी उपस्थित होते.