लाभार्थी म्हणतात! घाबरू नका, लस सुरक्षित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2021 04:28 AM2021-01-17T04:28:27+5:302021-01-17T04:28:27+5:30
बीड : जिल्ह्यात शनिवारी कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली. या लसीबाबत अनेकांच्या मनात लस घेतल्यानंतर त्याचे काही साईडइफेक्ट होतील का, ...
बीड : जिल्ह्यात शनिवारी कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली. या लसीबाबत अनेकांच्या मनात लस घेतल्यानंतर त्याचे काही साईडइफेक्ट होतील का, असा गैरसमज होता. परंतु असे काही नाही. घाबरू नका, लस पूर्णपणे सुरक्षित आहे, असा विश्वास शनिवारच्या लाभार्थ्यांनी दिला आहे. त्यामुळे मनातून गैरसमज काढा आणि लस घेण्यासाठी पुढे या, अशा प्रतिक्रिया त्यांनी दिल्या. ‘लोकमत’ने पहिल्या लाभार्थ्याशी संवाद साधल्यानंतर त्यांनी सर्वांना आवाहन केले.
काय म्हणतात, लस घेणारे लाभार्थी - सर्वांचे पासपोर्ट फोटो
कोट
लस घेऊन तीन तास झाले. कसलाही त्रास नाही. या लसीबद्दलच्या सुरक्षिततेची आगोदरच खात्री होती आणि आजही आहे. ही लस सर्वांनी घ्यावी. यामुळे स्वत:सह कुटुंब आणि सेवा देणाऱ्या रुग्णांना फायदा होईल.
डॉ. अनुराग पांगरीकर
आयएमए अध्यक्ष तथा पहिले लाभार्थी
---
कोट
लस घेण्यापूर्वी आणि घेतल्यानंतरही मला कसलाच त्रास नाही. इतरांनीही ही लस घ्यावी. जर आपल्याला कोमॉर्बिड आजार असतील, तर त्याची कल्पनाही देणे गरजेचे आहे. मी समाधानी आहे.
डी. बी. खोमणे
दिव्यांग पहिले लाभार्थी
----
कोट
आरोग्य विभागातच काम करीत असल्याने याची भीती नव्हती. शासनाने सर्व तपासणी करूनच ही लस दिली आहे. त्यामुळे कोणीही न घाबरता ही लस घ्यावी. मनातील सर्व गैरसमज दूर करणे गरजेचे आहे.
गणेश पवार
पहिला कर्मचारी लाभार्थी
---
कोट
महिला म्हणून पहिली लस देण्याचा सन्मान मला मिळाला, याचे भाग्य समजते. ही लस सुरक्षित आहे. लस घेतली तरी कोरोना नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. २८ दिवसानंतर पुन्हा दुसरा डोस घ्यायचा आहे. देशातील वैज्ञानिकांचा मला अभिमान आहे.
डॉ. संजीवनी कोटेचा
महिला पहिल्या लाभार्थी