बीड जिल्ह्यातील ५ हजार १३२ अंगणवाडी सेविकांना लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2018 11:40 PM2018-11-13T23:40:49+5:302018-11-13T23:42:04+5:30

राज्यातील अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचे सेवा समाप्तीचे वय ६० वरून ६५ वर्षे करण्यास मंगळवारी मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. या निर्णयाचा जिल्ह्यातील ५ हजार १३२ अंगणवाडी सेविका, मदतनीस यांना लाभ होणार आहे.

Benefits to 5,13,122 Aanganwadi sevaks in Beed district | बीड जिल्ह्यातील ५ हजार १३२ अंगणवाडी सेविकांना लाभ

बीड जिल्ह्यातील ५ हजार १३२ अंगणवाडी सेविकांना लाभ

googlenewsNext
ठळक मुद्देदोन वेळा तपासणी अनिवार्य : नवीन सेवेत येणाऱ्या सेविकांना तांत्रिक ज्ञान आवश्यक, भरतीवेळी घेण्यात येणार प्रावीण्य परीक्षा

लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : राज्यातील अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचे सेवा समाप्तीचे वय ६० वरून ६५ वर्षे करण्यास मंगळवारी मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. या निर्णयाचा जिल्ह्यातील ५ हजार १३२ अंगणवाडी सेविका, मदतनीस यांना लाभ होणार आहे.
जिल्ह्यात २४९० मोठया अंगणवाडी आहेत. अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांची संख्या जवळपास ४ हजार ९८० इतकी आहे. तर मिनी अंगणवाडींची संख्या ५५० इतकी आहे. येथील सेविका व मदतनीसांची संख्या एक हजाराच्या आसपास आहे. शासनाने घेतलेल्या निर्णयाचा लाभ कार्यरत असलेल्या ५ हजार १३२ अंगणवाडी सेविका, मदतनीसांना होणार आहे. एकात्मिक बाल विकास सेवा योजनेंतर्गत अंगणवाडी केंद्रात कार्यरत असलेल्या अंगणवाडी सेविका व मदतनीसांवर केंद्र शासनाने सोपविलेल्या जबाबदाºया पाहता त्या शारीरिकदृष्ट्या काम करण्यास सक्षम असणे आवश्यक आहे. ६० वर्षानंतर कोणत्याही व्यक्तीस सक्षमपणे काम करण्यास वैद्यकीय कारणास्तव अडचणी येतात. त्यामुळे अशा व्यक्तींची वैद्यकीय तपासणी करणे आवश्यक असते. शासनाच्या निर्णयानुसार १ डिसेंबर २०१८ रोजी वयाची ६० वर्षे पूर्ण केलेल्या अंगणवाडी सेविका-मदतनीसांची वैद्यकीय तपासणी करावी लागणार आहे. त्या काम करण्यास पात्र असल्याबाबतचे सक्षम वैद्यकीय अधिकाºयांचे प्रमाणपत्र सादर केल्यानंतरच त्यांना मानधनी सेवेत ठेवण्यात येणार आहे. ६० तसेच ६३ वर्षे सेवा पूर्ण झाल्यानंतर असे दोन वेळा वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. राज्याच्या महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी मार्च २०१८ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्यातील अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविकांच्या सेवा समाप्तीचे वय ६० वरून ६५ वर्षे करण्याचे आश्वासन दिले होते.
सेविका नेमणुकीनंतर ६० वर्षांची सेवा
नव्याने नियुक्त (१ नोव्हेंबर २०१८ पासून) अंगणवाडी सेविका, मदतनीस, मिनी अंगणवाडी सेविका तसेच अंगणवाड्यांच्या एकत्रिकरणानंतर मदतनीसाची अंगणवाडी सेविका म्हणून नेमणूक केल्यास त्यांची मानधनी सेवा ६० वर्षे राहणार आहे.
अंगणवाडी केंद्राच्या कामकाजासह माहिती संकलनाचे कामकाज डिजीटल होत असून अंगणवाडीबाबतच्या नोंदी कॉमन अ‍ॅप्लीकेशन सॉफ्टवेअर मध्ये भरावयाच्या असल्याने अंगणवाडी सेविकांना तांत्रिक ज्ञान असणे आवश्यक आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी वेळोवेळी प्रावीण्य परीक्षा घेण्यात येणार आहे.

Web Title: Benefits to 5,13,122 Aanganwadi sevaks in Beed district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.