कोरोनाचा फायदा, शुभंकरोती पाठ, नमाजाचे पठन अन् प्रभू येशूंची प्रार्थना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 04:37 AM2021-09-23T04:37:40+5:302021-09-23T04:37:40+5:30

बीड : कोरोना काळात मुले घरात थांबल्याने मुलांमध्ये धार्मिक संस्कारांची मुळे अधिक रुजण्यास काही प्रमाणात मदत झाली आहे. मात्र, ...

The benefits of the corona, the recitation of the mascot, the recitation of the prayers and the prayer of the Lord Jesus | कोरोनाचा फायदा, शुभंकरोती पाठ, नमाजाचे पठन अन् प्रभू येशूंची प्रार्थना

कोरोनाचा फायदा, शुभंकरोती पाठ, नमाजाचे पठन अन् प्रभू येशूंची प्रार्थना

Next

बीड : कोरोना काळात मुले घरात थांबल्याने मुलांमध्ये धार्मिक संस्कारांची मुळे अधिक रुजण्यास काही प्रमाणात मदत झाली आहे. मात्र, कोरोनामुळे सर्वच धर्मांतील मुलांवर मूल्यसंस्कार रुजविताना अडथळे आले आहेत. त्यामुळे मोठी पोकळी निर्माण झाल्याचे धर्मगुरू, संत-महंत सांगतात. संस्कारशील पिढी निर्माण होण्यासाठी धर्मसंस्कार महत्त्वाचे आहेत. प्रथा, परंपरेनुसार सण, उत्सव, पर्वप्रसंगांच्या माध्यमातून हे संस्कार रुजविण्याचा प्रयत्न होत असतो; परंतु कोरोनामुळे मुले घरातच राहिली, त्यामुळे शिक्षणासोबतच नैतिक व धर्मसंस्कारांची बीजे रुजविताना अडचणी आल्या. त्यामुळे ऑनलाइन संस्कार वर्गाचा पर्याय वापरात आला. दुसरीकडे संस्कारशील, धर्मानुभवी पालक पुढच्या पिढीला मूल्यसंस्कार देण्यासाठी विविध माध्यमांद्वारे प्रयत्न करताना दिसून आले. मागील दीड वर्षात विस्कळीतपणा आला तरी शुभंकरोती पाठ अन् नमाजाचे पठन आणि प्रभू येशूंची प्रार्थना घराघरातून करण्यात आली.

प्रत्येक धर्मात संस्काराचे धडे

हिंदू - मुलांमध्ये धर्म संस्काराची बीजे रुजविण्यासाठी संस्कारशील पालक प्रयत्नशील असतात. मंदिर, सण, उत्सव, कथा, सप्ताह, पर्व साजरे करताना, तसेच कीर्तन, भजनातून मूल्य संस्कार रुजावेत हाच उद्देश असतो. कोरोना काळात संस्कार कुलम, संत वचनामृत उपक्रमाच्या माध्यमातून ऑनलाइन संस्कार वर्ग चालविण्यात आले.

मुस्लीम - सर्वच धर्म मानवतेची शिकवण देतात. खरे बोला, कोणाला फसवू नका, कोणासाठी बाधा बनू नका पोहोचवू नका, कुठलाही गुन्हा करू नका, मानवता, प्रेम, सद्भावना, बंधुभावाची शिकवण दिली जाते. मदरसा, मकसदमध्ये मुलांवर हे संस्कार रुजविले जातात. कुराण पठन, नमाजच्या माध्यमातून धर्मसंस्कार रुजविले जात आहेत.

ख्रिश्चन - धर्मग्रंथातील वचने धार्मिक व आध्यात्मिक शिक्षणात महत्त्वाची आहेत. चर्चमधील उपदेश, प्रार्थना, बायबल स्कूल, मदर डे, फादर डे, सण, पर्वच्या माध्यमातून मानवी मने अधिकाधिक समृद्ध करण्यासाठी प्रयत्न सुरू असतात. ऑनलाइनद्वारे धर्मसंस्काराचे प्रयत्न सुरू आहेत.

धर्म म्हणजे सदाचरण, मानवतेची शिकवण

हिंदू बॉक्स

धर्म म्हणजे सदाचरण, शुद्ध, सत्य सदाचरण करण्यासाठी धर्मसंस्कार, मानवी मूल्यांची जपणूक होते. कोरोना काळात धर्मसंस्कार रुजताना दिसले. मुले घरी असल्याने त्यांच्यामध्ये धर्मसंस्कार रुजविण्यासाठी पालक सजग दिसले. रामरक्षा पठन, हनुमान चालिसा पठन, विष्णू सहस्ररनाम, सुंदरकांड दोहाचे पठन, शुंभकरोती प्रार्थना, श्लोकातून ही रुजवण होत आहे. त्याचे सिंचन व्हावे. -- एकनाथ महाराज पुजारी, बीड

मुस्लीम बॉक्स

संस्कार, अखलात, अदाब, तहजीब, सलीखा, तरिका ही मूल्ये रुजविताना कोरोना काळात विस्कळीतपणा आला. त्यामुळे अनेक मुले वंचित राहिली. प्रत्येक घरात शिक्षित पालक असतील असे नाही. निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यासाठी, मानवतेची शिकवण धर्मसंस्कारातून देण्यासाठी प्रयत्न सुरूच आहेत. -- मौलाना मुफ्ती जावेद साहब, बीड

ख्रिश्चन बॉक्स

कोरोनाच्या परिस्थितीमुळे आध्यात्मिक संस्कार देता आले नाहीत. पवित्र ग्रंथामध्ये प्रभाव पाडणाऱ्या महापुरुषांची माहिती शिकविता आली नाही. मुलांमध्ये संस्काराची रुजवण आई-वडिलांच्या प्रवृत्तीवर अवलंबून असते. ऑनलाइनद्वारे चर्चमधील उपदेश, प्रार्थना कार्यक्रम सुरू होते. मात्र, बायबल स्कूल, पर्वप्रसंग साजरे करता आले नाहीत.

- रेव्ह. चार्ल्स सोनवणे, पास्टर इन्चार्ज, असेम्बलीज ऑफ गॉड चर्च, बीड

Web Title: The benefits of the corona, the recitation of the mascot, the recitation of the prayers and the prayer of the Lord Jesus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.