१२५ शेतकऱ्यांना फुंडकर फळबाग योजनेचा लाभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2019 12:40 AM2019-01-25T00:40:25+5:302019-01-25T00:40:31+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क माजलगाव : कृषी विभागाच्या भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजनेचा तालुक्यातील १२५ शेतक-यांना लाभ मिळाला आहे. ६३.३५ हेक्टरवर ...
लोकमत न्यूज नेटवर्क
माजलगाव : कृषी विभागाच्या भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजनेचा तालुक्यातील १२५ शेतक-यांना लाभ मिळाला आहे. ६३.३५ हेक्टरवर फळबागाची लागवड करण्यात आली असून, याद्वारे शेतक-यांना २३ लाख एवढे अनुदान मिळाले आहे.
ज्या शेतक-यांना फलबाग लागवड करायची होती.परंतू त्यांच्याकडे रोजगार हमीचे जॉब कार्ड नसल्याने त्यांना फलबाग योजनेचा लाभ मिळत नव्हता.परंतू भाऊसाहेब फुंडकर योजनेत या अटी शिथील केल्याने जॉब कार्ड नसलेल्या शेतक-यांना मोठा लाभ मिळत असून शेतक-यांना १०० टक्के अनुदान मिळणार आहे. माजलगाव कृषी कार्यालयाच्या अंतर्गत सर्वसाधारण शेतक-यांसाठी ३६ लाख रु पये, अनु.जातीतील शेतक-यांना २ लाख तर अनु.जमातीसाठी २८ हजार एवढा निधी उपलब्ध झाला होता. तालुक्यातील ९९७ शेतक-यांनी या योजनेसाठी अर्ज दाखल केले होते. अर्ज मोठ्या प्रमाणात आल्याने याची सोडत घेण्यात येवून ६६५ शेतक-यांना या योजनेसाठी पूर्वसंमती देण्यात आली.या शेतक-यांना ६४१ हेक्टर लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले त्यापैकी १२५ शेतक-यांच्या १०९ हेक्टरला तांत्रिक मान्यता देण्यात आली. त्यापैकी ६७ शेतक-यांनी ६३.३५ हेक्टरवर फलबाग लागवड केली.
फळबाग लागवडीची मुदत नोव्हेंबरमध्ये संपली होती परंतू त्याला मुदत वाढवून ३१ मार्च करण्यात आली.फुंडकर फलबाग योजनेअंतर्गत फलबाग लागवड करणा-या शेतक-यांंना पहिल्या वर्षी ५० टक्के, दुस-या वर्षी २५ टक्के, तिस-या वर्षी २५ टक्के असा लाभ मिलणार आहे.