लॉटरी लागल्याचे ई-मेल किंवा मेसेज आल्यास सावधान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2021 04:37 AM2021-08-19T04:37:18+5:302021-08-19T04:37:18+5:30

बीड : डिजिटल पेमेंट प्रकरणातील अनेकांची फसवणूक झाल्याची उदाहरणे आपण बघितली आहेत. त्यातच लॉटरी लागल्याचे संदेश ...

Beware of e-mails or messages about lotteries | लॉटरी लागल्याचे ई-मेल किंवा मेसेज आल्यास सावधान

लॉटरी लागल्याचे ई-मेल किंवा मेसेज आल्यास सावधान

Next

बीड : डिजिटल पेमेंट प्रकरणातील अनेकांची फसवणूक झाल्याची उदाहरणे आपण बघितली आहेत. त्यातच लॉटरी लागल्याचे संदेश येताच नागरिकही लोभापायी त्याला प्रतिसाद देतात. मात्र, बँक खात्यावरील रक्कम लंपास झाल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येते. त्यानंतर पोलिसांत धाव घेतली जात असल्याचे चित्र आहे.

माहिती आणि तंत्रज्ञानाच्या काळात सर्व आर्थिक व्यवहार हे मोबाईलवरून केले जातात. दरम्यान ऑनलाईन आर्थिक फसवणूक प्रकरणे वाढली असल्याचे देखील चित्र आहे. मोबाईल क्रमांक हा बँक खात्याशी जोडलेला असतो. त्यावर विविध बक्षीस मिळणार असल्याचे आमिष दाखवून खात्यासंदर्भातील सर्व माहिती विचारून घेत खात्यावरील रक्कम लंपास केली जात असल्याचे प्रकार घडले आहेत. त्यामुळे नागरिकांनी सतर्कता बाळगण्याचे आवाहन प्रशासनाकडून केले जात आहे.

ई-मेलवरही फसवणूक

मोबाईलवर लॉटरी लागण्याचा संदेश तर येतोच, याशिवाय ई-मेलवरही लॉटरी लागल्याचे दिसून येते. असे ई-मेल न उघडता त्याला डिलिट करणे गरजेचे आहे. कुठलीही व्यक्ती किंवा संस्था कुणालाही लॉटरीचे पैसे देणार नाही. ही बाब समजून घेणे आवश्यक आहे. तरच फसवणूक थांबू शकते.

ही घ्या काळजी

लॉटरी लागल्याचे ई मेल किंवा मोबाईलवर संदेश आल्यावर ते उघडून पाहू नये. उघडले तरी त्यावर असलेल्या लिंकवर क्लिक करू नका. त्याच लिंकच्या माध्यमातून वैयक्तिक माहिती मागितली जाते. अनेकजण लॉटरीच्या आमिषामुळे ती सर्व माहिती भरतात. यामध्ये बँक खात्यासंदर्भातील तसेच एटीएम पिन नंबर यासह गोपनीय माहिती मागवलेली असती. ती माहिती दिली तर, तुमच्या खात्यावरील रक्कम लंपास केली जाते. ही बाब लक्षात आल्यानंतर फसवणूक झाल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला जातो. मात्र, फसवणूक होऊ नये यासाठी सर्वांनी काळजी घेतली पाहिजे असे आवाहन विभागाकडून करण्यात आले आहे.

वेबसाईटची सुरुवात ‘एचटीटीपीएस’ पासून झाली आहे का ?

सामान्यत: बहुतांश वेबसाईटची सुरुवात एचटीटीपीएसपासून होते. यामुळे नागरिकांचा सहजपणे आलेल्या ई-मेल संदेशावर पटकन विश्वास बसतो. त्यानंतर आपण देखील तो ई मेल उघडून वैयक्तिक माहिती शेअर केली जाते. तिथेच नागरिकांची फसवणूक होते. अशा सदोष वेबसाईटच्या शब्दांपासून सुरु होणारी वेबसाईट खरी असेल असे नाही.

मोबाईलवरून केली फसवणूक

केस १ : काही दिवसांपूर्वी एका निवृत्त अधिकाऱ्यांच्या फोनवर आलेल्या संदेशाच्या माध्यमातून त्याच्या तीन बँकेच्या खात्यातून रक्कम लंपास झाली होती. ही बाब संबंधिताच्या ३ महिन्यानंतर लक्षात आली, त्यानंतर पोलीस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. मात्र, अशा प्रकरणाचा तपास लागण्यासाठी अनेक तांत्रिक अडथळे निर्माण होतात. त्यामुळे संथ गतीने तपास होत असतो.

केस २ : एका विद्यार्थिनीला तिच्या मोबाईलवर फोन आला की, कस्टमर केअरमधून बोलत असून, तुमचे अडकलेले पैसे परत मिळतील जसे सांगेल तशी प्रक्रिया करा. त्या विद्यार्थिनीने देखील सर्व प्रक्रिया पूर्ण केली त्यानंतर बॅँक खात्यातून ४० हजार रुपये लंपास केले. त्यानंतर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Beware of e-mails or messages about lotteries

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.