सोशल मीडियापासून सावधान;फेसबुकवर मुलीसोबत फ्रेंडशिप,प्रेमाचे नाटक अन पळवून नेऊन अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2022 02:53 PM2022-02-17T14:53:52+5:302022-02-17T14:54:16+5:30

आरोपी सतत सिमकार्ड बदलत असे, त्यामुळे त्याचा ठावठिकाणा लावणे अडचणीचे ठरत होते.

Beware of social media; friendship with girl on Facebook, love drama and kidnapping and raped | सोशल मीडियापासून सावधान;फेसबुकवर मुलीसोबत फ्रेंडशिप,प्रेमाचे नाटक अन पळवून नेऊन अत्याचार

सोशल मीडियापासून सावधान;फेसबुकवर मुलीसोबत फ्रेंडशिप,प्रेमाचे नाटक अन पळवून नेऊन अत्याचार

Next

बीड : शहरातील एका अल्पवयीन मुलीशी फेसबुकवर ओळख झाली. यातून झालेल्या मैत्रीतून तरुणाने तिला पळवून नेले. त्यानंतर पुण्यातील कात्रज परिसरात फ्लॅट किरायाने करून अत्याचार केला. या तरुणाला १६ फेब्रुवारी रोजी शिवाजीनगर पोलिसांनी बेड्या ठोकल्या.

शेख समीर शेख अजिमोद्दीन (२१, रा. तेलगाव नाका, बीड) असे त्या आरोपीचे नाव आहे. काही महिन्यांपूर्वी त्याची फेसबुकवर नववीच्या वर्गात शिकणाऱ्या १४ वर्षीय अल्पवयीन मुलीशी ओळख झाली. मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. दरम्यान, १० फेब्रुवारी रोजी त्याने मुलीला घेऊन बीडमधून पलायन केले. पुण्यातील कात्रज परिसरात फ्लॅट किरायाने करून ते तेथे राहिले. या दरम्यान त्याने तिच्यावर बळजबरीने अत्याचार केला. 

११ रोजी मुलीच्या आईच्या तक्रारीवरून शिवाजीनगर ठाण्यात बेपत्ताची नोंद केली. उपनिरीक्षक शैलेश शेजुळ, पो. ना. मोहसीन शेख यांनी तांत्रिक माहितीआधारे १६ रोजी कात्रज पोलीस चौकीपुढील एका हॉटेलमध्ये शेख समीरला पकडले. पीडित मुलीसह त्याला घेऊन पथक १७ रोजी पहाटे बीडमध्ये पोहोचले. मुलीच्या जबाबवरून बलात्कार, बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंध कायद्याचे कलम वाढविण्यात येणार असल्याची माहिती उपनिरीक्षक शैलेश शेजुळ यांनी दिली.

सिमकार्ड बदलून पोलिसांना गुंगारा
दरम्यान, आरोपी शेख समीर हा सतत सिमकार्ड बदलत असे. त्यामुळे त्याचा ठावठिकाणा लावणे अडचणीचे ठरत होते. मात्र, अखेर शिवाजीनगर पोलीस त्याच्यापर्यंत पोहोचलेच. गुन्हेकृत्यामुळे बीएससी द्वितीय वर्षात शिकणाऱ्या शेख समीरचे शैक्षणिक भवितव्य अंधःकारमय बनले आहे.

Web Title: Beware of social media; friendship with girl on Facebook, love drama and kidnapping and raped

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.