शेतकऱ्यांची फसवणूक करणार्या दुकानदारांनो सावधान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 04:23 AM2021-06-10T04:23:00+5:302021-06-10T04:23:00+5:30
अविनाश कदम लोकमत न्यूज नेटवर्क आष्टी : तालुक्यात महाबीज, निर्मल कंपनीचे उडीद बियाणे व खतांचा दुकानदारांकडून साठेबाजी करून कृत्रिम ...
अविनाश कदम
लोकमत न्यूज नेटवर्क
आष्टी : तालुक्यात महाबीज, निर्मल कंपनीचे उडीद बियाणे व खतांचा दुकानदारांकडून साठेबाजी करून कृत्रिम तुटवडा निर्माण केला जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून केला जात आहे. दरम्यान, नियमांची अंमलबजावणी न करणाऱ्या आठ कृषी केंद्र चालकांना कृषी विभागाने नोटिसा बजावल्या आहेत. यासाठी कृषी विभागाने सर्च ऑपरेशन सुरू केले आहे.
खते, बियाणे मागणीच्या तुलनेत पुरवठा होत नसल्याने शेतकऱ्यांना दुसऱ्या कंपनीचे बियाणे, खते खरेदी करावी लागत आहेत. काही ठिकाणच्या कृषी केंद्र चालकांकडून बियाणे व खताची चढ्या भावाने विक्री सुरू आहे. यात शेतकऱ्यांची आर्थिक लूट केली जात आहे. कृषी केंद्रचालक मनमानी किंमत आकारून खते, बियाण्यांची विक्री करीत आहेत. यामुळे शेतकऱ्यांच्या खिशाला झळ बसत आहे. तोंड पाहून बियाण्यांची व खताची विक्री होत आहे. मालाचा तुटवडा तर मग ओळखीच्या लोकांना संध्याकाळी खते, बियाणे कसे उपलब्ध होते. सर्वसामान्यांना दुकानदार बियाणे शिल्लक नाही, असे सांगतात. असा सवाल शेतकरीवर्गातून विचारला जात आहे.
यावर्षी पाऊस पेरणीयोग्य झाल्याने शेतकऱ्यांनी कापूस लागवड कमी करून उडीद, तूर या पिकाकडे ओढ घेतली आहे. या बियाण्यांची वाढती मागणी पाहता तालुक्यातील काही कृषी केंद्र चालक मागणी असलेल्या महाबीज, निर्मल उडीद बियाण्याचा स्टाॅक करून ओळखीच्या लोकांना चढ्या दराने विक्री करत आहेत. एका पिशवीमागे १०० ते २०० रुपये जादा आकारून शेतकऱ्यांची आर्थिक लूट करीत आहेत.
आष्टी तालुक्यात खत उपलब्ध असूनसुद्धा खतांचा तुटवडा दाखविला जात आहे. शेतकऱ्यांकडून १०० ते २०० रुपये चढ्या भावाने दर आकारून खताची विक्री सुरू आहे. अनेक कृषी केंद्रांमध्ये दर फलक, स्टॉक बुकही उपलब्ध नाही. दुकानदारांनी साठेबाजी केल्याने बियाणे व खतांचा काळा बाजार होत आहे, असा आरोप शेतकऱ्यांकडून केला जात आहे.
.....
कृषी केंद्र चालकांनी शेतकऱ्यांना सहकार्य करावे
तालुक्यातील कोणत्याही कृषी केंद्र चालकांनी कंपनीने जाहीर केलेल्या ग्रेडनिहाय खतांच्या किमतीपेक्षा व बियाण्यांची जास्त दराने विक्री करू नये. शेतकऱ्यांनी एकाच कंपनीचे बियाणे मागून त्याचे महत्त्व वाढवू नका. उपलब्ध असेल ते बियाणे पेरावे. शेतकऱ्यांच्या सह्या न घेतल्याने, भाव फलक न लावलेल्या आठ दुकानदारांना नोटिसा बजावल्या आहेत. आठ दिवसात खुलासा प्राप्त झाल्यानंतर कारवाई करण्यात येणार आहे. तालुक्यातील सर्व दुकानांची तपासणी करून फसवणूक करणार्या दुकानदारा्ंवर कारवाई करण्यात येणार आहे. मंगळवारी कृषी सहाय्यकांनी दुकानांना भेटी दिल्या आहेत. गुरुवारपासून सर्च ऑपरेशन करण्यात येणार आहे. कृषी केंद्र चालकांनी शेतकऱ्यांना सहकार्याची भूमिका ठेवावी.
- राजेंद्र सुपेकर, तालुका कृषी अधिकारी, आष्टी.
....
===Photopath===
090621\img-20210609-wa0242_14.jpg
===Caption===
या फोटोतील दुकानाचे नाव कट करावे