सोंगाढोंगाच्या लोकांपासून सावध राहा, धनुष्यबाण घराघरात पोहोचवा- जयदत्त क्षीरसागर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2019 12:53 AM2019-09-27T00:53:32+5:302019-09-27T00:53:55+5:30

गट तट बाजूला ठेवा, शिवसेनेचा विजय निश्चित आहे, असा विश्वास रोहयो मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी व्यक्त केला.

Beware of Tsongadonga people, deliver your bow to the house | सोंगाढोंगाच्या लोकांपासून सावध राहा, धनुष्यबाण घराघरात पोहोचवा- जयदत्त क्षीरसागर

सोंगाढोंगाच्या लोकांपासून सावध राहा, धनुष्यबाण घराघरात पोहोचवा- जयदत्त क्षीरसागर

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : निवडणुकीचे पडघम वाजले आहेत. विजयासाठी वज्रमुठ आवळा, गावाकडे जा, धनुष्यबाण घराघरामध्ये पोहचेल असे काम करा, सोंगाढोंगाची लोक गावाकडे येतील, गळ्यात हात घालून मतदान मागतील आणि याच हाताने कधी गळा दाबतील ते सांगता येत नाही, याची काळजी घ्या, गट तट बाजूला ठेवा, शिवसेनेचा विजय निश्चित आहे, असा विश्वास रोहयो मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी व्यक्त केला.
राजुरी आणि कामखेडा या दोन पंचायत समिती गणातील कार्यकर्त्यांची बैठक वंजारवाडी येथे आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला साक्षाळपिंप्री, बहाद्दरपूर, रूद्रापूर, अव्वलपूर, केतुरा, सोनगाव, पारगाव, शहाजानपूर, बहीरवाडी, बेलूरा, उमरद जहॉगीर, तांदळवाडी, रोहिलिंबा, लिंबारूई, मुर्शदपूर, राजुरी, तिप्पटवाडी, काटवटवाडी, वंजारवाडी येथील शिवसैनिक आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना जयदत्त क्षीरसागर म्हणाले की, आजच्या या बैठकीला दोन पंचायत समिती गणातून मोठ्या संख्येने तुम्ही उपस्थित राहिलात. ही उपस्थिती विजय निश्चित करणारी आहे. वज्रमुठ आवळून कामाला लागायचं आहे. आता सर्वजण गावाकडे जात आहात. धनुष्यबाण घराघरात पोहच झाला पाहिजे. सोंगाढोंगाची लोक गावात येतील. कुणी जातीवर तर कुणी गळ्यात हात घालून मतदान मागतील. अशा ढोंगी मंडळींच्या भूलथापांना थारा देऊ नका. सगळ्यांनी मनातून मदत केली तर आपला विजयाचा अश्वमेध कोणी रोखू शकणार नसल्याचे जयदत्त क्षीरसागर यांनी म्हटले. यावेळी दिलीप गोरे यांनीही मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाला जगदीश काळे, वैजीनाथ तांदळे, अरूण डाके, विलास बडगे, दिनकर कदम, नितीन धांडे, सखाराम मस्के आदी उपस्थित होते. या कार्यक्रमात कैलास जगताप आणि निलेश जगताप यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यांचा सत्कार क्षीरसागरांनी केला.
सध्या शिवसेनेच्या धनुष्यबाणाला निवडून आणण्याची सामान्य लोकांची स्पर्धा सुरू आहे. वातावरण अत्यंत पोषक आहे. मतभेद बाजूला ठेवा, मी कधी कोणाची जात किंवा गट याचा विचार केला नाही. आपलेपण जपण्याची हीच खरी संधी आहे. जनतेचे मुलभूत प्रश्न सोडवून घेण्यासाठी आणखी एका प्रयत्नाची गरज आहे.
- जयदत्त क्षीरसागर, रोहयो मंत्री

Web Title: Beware of Tsongadonga people, deliver your bow to the house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.