भरधाव वाळू टिप्परला ‘ब्रेक’ची गरज - A
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 04:32 AM2021-05-15T04:32:06+5:302021-05-15T04:32:06+5:30
बीड : जिल्ह्यातील गेवराई व माजलगाव तालुक्यातील गोदावरी पात्रातून वाळू उपसा मोठ्याप्रमाणात सुरू आहे. दरम्यान, वाळू वाहतूक करणाऱ्या टिप्पर ...
बीड : जिल्ह्यातील गेवराई व माजलगाव तालुक्यातील गोदावरी पात्रातून वाळू उपसा मोठ्याप्रमाणात सुरू आहे. दरम्यान, वाळू वाहतूक करणाऱ्या टिप्पर चालक वाहतूक नियमांची पायमल्ली करत आपला व इतर वाहनचालकांचा जीव धोक्यात घालत आहेत. त्यामुळे भरधाव वेगाला ‘ब्रेक’ लावण्याची मागणी केली जात आहे.
जिल्ह्यातील गेवराई व माजलगाव तालुक्यातील काही वाळू घाटांचे लिलाव करण्यात आले आहेत. याठिकाणावरून मोठ्याप्रमाणात वाळू उपसा व वाहतूक केली जात आहे. दरम्यान टिप्परच्या सहाय्याने केल्या जाणाऱ्या वाळू वाहतुकीमुळे अपघाताचे प्रमाण देखील वाढले आहे. लॉकडाऊन काळात देखील वाळू वाहतूक मोठ्याप्रमाणात अवैधरित्या सुरू असून, वाळू वाहतुकीच्या नियमांची पायमल्ली टिप्पर चालकांकडून केली जात असल्याच्या तक्रारी देखील वाढल्या आहेत. तर, भरधाव वेगातील टिप्परमधून सतत वाहतूक केल्यामुळे रस्ते देखील खराब झाले आहेत. त्यामुळे प्रशासनाने या वाळू वाहतूकदारांच्या वेगावर नियंत्रण आणावे, अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे.
वेगाला आवरणार कोण ?
एका दिवसात दोन किंवा तीन खेपा वाळू भरून आणण्यासाठी अनेक वेळा ताशी १२० ते १४० किलोमीटरच्या वेगाने टिप्पर धावते. महामार्गावर सर्वांधिक वेगाने टिप्पर चालवले जाते, त्यामुळे महामार्गावरील तसेच अंतर्गंत रस्त्यांवरील इतर वाहनचालकांच्या जिवाला धोका कायम असतो. तर, टिप्परचा वेग रोखण्यासाठी पोलीस व महसूल प्रशासनाने योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे विभागीय अध्यक्ष राहुल वायकर यांनी केली आहे.
===Photopath===
130521\241413_2_bed_16_13052021_14.jpg
===Caption===
टिप्पर