‘स्वाराती’च्या अधिष्ठातापदी भास्कर खैरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2021 04:37 AM2021-08-27T04:37:02+5:302021-08-27T04:37:02+5:30

तात्काळ पदभार स्विकारण्याचे आदेश अंबाजोगाई : स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठातापदी डॉ. भास्कर खैरे यांची नियुक्ती करण्यात आली ...

Bhaskar Khaire as the presiding deity of 'Swarati' | ‘स्वाराती’च्या अधिष्ठातापदी भास्कर खैरे

‘स्वाराती’च्या अधिष्ठातापदी भास्कर खैरे

Next

तात्काळ पदभार स्विकारण्याचे आदेश

अंबाजोगाई : स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठातापदी डॉ. भास्कर खैरे यांची नियुक्ती करण्यात आली असून, त्यांना तातडीने पदभार स्वीकारण्याचे आदेश महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाच्या संचालकांनी दिले आहेत.

या संदर्भात महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या संचालकांनी स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अंबाजोगाई या संस्थेचे दैनंदिन कामकाज हाताळण्यासाठी अधिष्ठाता या पदाचा अतिरिक्त कार्यभार डॉ. शिवाजी सुक्रे यांच्याकडे सोपविला होता. मात्र शासन स्तरावर प्राध्यापकपदाच्या एकत्रित सेवाज्येष्ठता यादीनुसार अधिष्ठाता या संवर्गात पदोन्नतीसाठी विचारक्षेत्रात समाविष्ट असलेल्या अध्यापकांना अधिष्ठातापदाचा अतिरिक्त कार्यभार दिल्यास त्यांना प्रशासकीय कामकाजाचा अनुभव येण्याच्या दृष्टीने अशा प्राध्यापकांना अधिष्ठातापदाचा अतिरिक्त कार्यभार देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

त्यानुसार स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अंबाजोगाई या संस्थेतील अधिष्ठातापदाचा अतिरिक्त कार्यभार नेत्रविभाग प्रमुख डॉ. भास्कर खैरे यांच्याकडे सुपूर्द करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

260821\img-20210826-wa0095.jpg

डॉ भास्कर

Web Title: Bhaskar Khaire as the presiding deity of 'Swarati'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.