भोकरदनमध्ये नागरिकांचे पाण्यासाठी ठिय्या आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2019 00:16 IST2019-06-13T00:15:51+5:302019-06-13T00:16:31+5:30
नगरपालिका प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे अद्यापही भोकरदन शहरातील पाणी पुरवठा सुरळीत झालेला नाही. यामुळे पाण्याविना नागरिकांचे हाल होत आहे. मात्र, याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने संतप्त नागरिकांनी बुधवारी नगरपालिकेला कुलूप ठोकून ठिय्या आंदोलन केले.

भोकरदनमध्ये नागरिकांचे पाण्यासाठी ठिय्या आंदोलन
भोकरदन : नगरपालिका प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे अद्यापही भोकरदन शहरातील पाणी पुरवठा सुरळीत झालेला नाही. यामुळे पाण्याविना नागरिकांचे हाल होत आहे. मात्र, याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने संतप्त नागरिकांनी बुधवारी नगरपालिकेला कुलूप ठोकून ठिय्या आंदोलन केले.
जुई, बानेगाव, धरण कोरडे पडल्यामुळे शहरातील नागरिकांना भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. सध्या अकोला देव येथून टँक्करने पाणी आणण्यात येत असले तरी ४० ते ४५ किलोमीटर अंतर आल्यामुळे टँककरच्या पूर्ण फेऱ्या होत नाही. त्यामुळे शहारत पाणी टंचाई निर्माण झाली आहे. नगर परिषद पाणीटंचाईचे निवारण करण्यात अपयशी ठरत असून आलेले पाणी नागरिकांना व्यवस्थित वाटप करण्यात येत नाही. अधिकारी व पदाधिकारी लक्ष देत नाही असा आरोप या नागरिकांनी केला आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी सुध्दा या नागरिकांनी आंदोलन केले होते. तरी सुध्दा पाणी टंचाईचा प्रश्न मिटला नाही. त्यामुळे नागरिकांनी बुधवारी नगर परिषद कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले.
यावेळी नुजेर शाह, महेबूब भारती, इसरार पठान, फहीम कादरी, जावेद शेख, मुजीब कुरेशी, आसिफ कुरैशी, अलीम शाह, शेख जाहिद, शेरखान, मोहमद शाहरुख शेख शाहरुख, अनीस भारती, रहीम कुरेशी, बिस्मिल्लाह कुरेशी आदींची उपस्थिती होती. यावेळी मुखाधिकाऱ्यांनी पाणी पुरवठा करणाºया टँकर बाबत माहिती दिली. व दोन दिवसात पाणी पुरवठा सुरळीत करण्याचा प्रयत्न करू असे सांगितल्यावर आंदोलनकर्त्यांनी आंदोलन मागे घेतले.
दोन दिवसांत : पाणीपुरवठा सुरळीत
याविषयी न.पं. मुख्याधिकारी अमितकुमार सोंडगे यांनी सांगितले की, दोन्ही धरणे कोरडी पडली आहे. शिवाय चराचे पाणी कमी झाल्यामुळे शहरात पाणी टंचाई वाढली आहे. अकोला देव येथून टँकरच्या फेºया पूर्ण होत नाही. मात्र, वरिष्ठ अधिकारी, पदाधिकारी व आम्ही खडक पूर्णा धरणातून जाफराबाद पर्यंत पाणी आणले असून दोन दिवसातच शहराला टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. असेही सोंडगे यांनी सांगितले.