साडेतीन कोटींच्या कामांचे चिंचोलीमाळी येथे भूमिपूजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2021 04:27 AM2021-01-02T04:27:54+5:302021-01-02T04:27:54+5:30

जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत ३ कोटी प्राथमिक आरोग्य केंद्र नवीन इमारत, १६ लक्ष प्राथमिक शाळा वर्ग खोली -२, ३० लाख ...

Bhumi Pujan at Chincholimali for works worth Rs 3.5 crore | साडेतीन कोटींच्या कामांचे चिंचोलीमाळी येथे भूमिपूजन

साडेतीन कोटींच्या कामांचे चिंचोलीमाळी येथे भूमिपूजन

Next

जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत ३ कोटी प्राथमिक आरोग्य केंद्र नवीन इमारत, १६ लक्ष प्राथमिक शाळा वर्ग खोली -२, ३० लाख रुपयांचा गेटेड बंधारा-२ अशा एकूण ३ कोटी ४६ लक्ष खर्चाचे बांधकाम करण्यात येणार आहे.

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष शिवाजी सिरसाट तर प्रमुख पाहुणे नवाब, संजय गांधी निराधार योजना समिती नवनिर्वाचित अध्यक्ष बालासाहेब बोराडे, खरेदी-विक्री संघाचे चेअरमन विलास जोगदंड, पंचायत समिती सदस्य नारायण शिंदे, दत्तात्रय ठोंबरे, प्रेमचंद कोकाटे, उमाकांत भुसारी, शिवाजी (बंडू) चौधरी, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष नंदकुमार मोराळे, युवक तालुकाध्यक्ष मुकुंद कणसे, शहराध्यक्ष भाऊसाहेब गुंड आदी उपस्थित होते.

प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ३ कोटी खर्चाच्या नवीन इमारतीचे बांधकाम मंजूर करून बीड जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा शिक्षण व आरोग्य सभापती बजरंग सोनवणे यांनी गावातील व पंचक्रोशीतील जनसामान्यांना दिलेला शब्द पूर्ण केला आहे. नवीन इमारत बांधकाम करणे अत्यंत गरजेचे होते. जवळपासच्या सर्व गावांच्या आरोग्याच्या दृष्टीने हे प्राथमिक आरोग्य केंद्र सोयीचे ठरणार आहे. या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या भूमिपूजनप्रसंगी बप्पा यादव, राम मेजर, राम नखाते, बाळासाहेब गलांडे, गुलाब पठाण, माणिक गालफाडे, बिटू यादव, अशोक बेर्डे, संग्राम आगे, बाळासाहेब राऊत, डाॅ. आठवले, श्रीकांत घुले, आकाश गायकवाड, उपअभियंता खेडकर, डाॅ. सांगळे, डाॅ. चौरे व गावातील तसेच पंचक्रोशीतील ग्रामस्थ उपस्थित होते.

Web Title: Bhumi Pujan at Chincholimali for works worth Rs 3.5 crore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.