संत शिरोमणी नरहरी महाराज सांस्कृतिक सभागृहाचे भूमिपूजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 04:33 AM2021-04-16T04:33:35+5:302021-04-16T04:33:35+5:30

परळी : येथील सुवर्णकार समाजाला दिलेल्या शब्दाची पूर्तता करत सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी संत शिरोमणी नरहरी महाराज सांस्कृतिक ...

Bhumi Pujan of Sant Shiromani Narhari Maharaj Cultural Hall | संत शिरोमणी नरहरी महाराज सांस्कृतिक सभागृहाचे भूमिपूजन

संत शिरोमणी नरहरी महाराज सांस्कृतिक सभागृहाचे भूमिपूजन

Next

परळी : येथील सुवर्णकार समाजाला दिलेल्या शब्दाची पूर्तता करत सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी संत शिरोमणी नरहरी महाराज सांस्कृतिक सभागृहासाठी ७० लाख रुपये निधी उपलब्ध करून दिला असून, मंगळवारी गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर पालकमंत्री मुंडे यांच्या हस्ते सभागृहाच्या बांधकामाचे भूमिपूजन करण्यात आले.

या सभागृहाचे बांधकाम दर्जेदार व जलदगतीने पूर्ण केले जावे तसेच त्यासाठी आणखी निधीची आवश्यकता भासली तर तो उपलब्ध करून देऊ, असेही यावेळी मुंडे म्हणाले.

या कार्यक्रमाला माजी नगराध्यक्ष दीपक देशमुख, शंकर आडेपवार, सभापती गोपाळ आंधळे, गोविंद मुंडे, सुरेश टाक, माजी उपनगराध्यक्ष अय्युब खान पठाण, शिवसेना तालुकाप्रमुख व्यंकटेश शिंदे, नगरसेवक विजय भोयटे, नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉ. अरविंद मुंडे, नगर परिषद अभियंता आर. एच. बेंडले, रमेश भोयटे, राहुल टाक, राजाभाऊ दहिवाळ, भारत टाक, सुनील दहिवाळ, रमेश धारसूरकर, संतोष उदावंत, सुनील विडेकर, दत्ता दीक्षित, अशोक शहाणे, रमाकांत डहाळे, आदी उपस्थित होते.

===Photopath===

150421\15_2_bed_12_15042021_14.jpeg

===Caption===

संत शिरोमणी नरहरी महाराज सांस्कृतिक सभागृहाचे भूमीपूजन

Web Title: Bhumi Pujan of Sant Shiromani Narhari Maharaj Cultural Hall

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.