सौताड्याच्या भूमिपुत्राचा काश्मीर ते कन्याकुमारी सायकल प्रवास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2021 04:34 AM2021-04-04T04:34:29+5:302021-04-04T04:34:29+5:30
पाटोदा : प्रदूषणमुक्त भारत व इंधन बचतीचा नारा देत काश्मिरपासून ते कन्याकुमारीपर्यंत सायकलवर निघालेल्या सौताडा येथील रहिवासी व जामखेड ...
पाटोदा : प्रदूषणमुक्त भारत व इंधन बचतीचा नारा देत काश्मिरपासून ते कन्याकुमारीपर्यंत सायकलवर निघालेल्या सौताडा येथील रहिवासी व जामखेड येथे व्यवसायानिमित्त स्थायिक असलेले डॉ. पांडुरंग सानप व जामखेड येथील एक मित्र या दोघांनी तेरा दिवसात २८५० किलोमीटर अंतर पार केले असून अद्याप ९५० किलोमीटर अंतराचा प्रवास बाकी आहे. चार दिवसात हे अंतर पूर्ण करत ते कन्याकुमारीला पोहचणार आहेत.
काश्मीरमधील थंड हवा तर कर्नाटक व तामिळनाडू येथील उष्ण हवेचा सामना करत त्यांनी आतापर्यंतचा प्रवास केला आहे. प्रदूषणमुक्त भारत, इंधन बचत हा त्यांचा नारा आहे. हा प्रवास दहा राज्यांमधून होत आहे. आता शेवटी एक तामिळनाडू राज्य बाकी आहे. या राज्यात तापमान जास्त आहे. काश्मीरमध्ये फार थंडी होती. अणि राजस्थान, कर्नाटकात सर्वाधिक तापमानाची नोंद अशा वातावरणाशी वातावरणाशी जुळवून घेत दोघांचा सायकल प्रवास सुरू आहे.
जामखेड येथील वैद्यकीय क्षेत्रातील डॉ. पांडुरंग सानप व केमिस्ट भास्कर भोरे हे दोन साहसवीर ‘सायकल रायडिंग’ अर्थात सायकलवरून प्रवास पर्यावरण संवर्धन व इंधन बचतीचा संदेश देण्यासाठी तब्बल ४००० किलोमीटरचा प्रवासाचे ध्येय ठेवून काश्मीर ते कन्याकुमारी असा देशांच्या दोन टोकांचा प्रवास करत जनजागृती करत आहेत.
के २ के म्हणजेच काश्मीर ते कन्याकुमारी अशी त्यांची सायकल यात्रा असून १४ मार्च रोजी सायंकाळी जामखेड शहरात हिरवा झेंडा दाखवून या सायकल स्वारांना निरोप देण्यात आला होता. डॉ.पांडुरंग सानप यांनी आतापर्यंत आयर्न मॅन स्पर्धा नियोजित वेळेपेक्षा एक तास आगोदर पूर्ण करत इतिहास रचला होता. तसेच दरवर्षी गडकिल्ल्यांवर सायकलवर जात असतात. आता ते पर्यावरण रक्षणाचा व इंधन बचतीचा संदेश देणार आहेत. दररोज सोशल मीडियावर किती प्रवास केला? कोठे आहेत ? हा संदेश देतात त्यांना मोठ्या प्रमाणावर प्रोत्साहनही मिळत आहेत.
===Photopath===
020421\2620popat raut_img-20210402-wa0081_14.jpg