लाचप्रकरणी बीडमध्ये एपीआय केळे एसीबीला शरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2018 12:41 AM2018-05-23T00:41:46+5:302018-05-23T00:41:46+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : ४० हजार रूपयांची लाच घेतल्याप्रकरणी धारूर ठाण्याचे सहायक फौजदार अमिरोद्दीन इनामदार, पो.हे.काँ. दत्तात्रय बिक्कड, सहायक पोलीस निरीक्षक नीलेश केळे, छत्रभुज थोरात, अशोक हंडीबाग यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. पैकी सहायक फौजदार अमिरोद्दीन इनामदार, पो.हे.कॉ. दत्तात्रय बिक्कड व छत्रभुज थोरात यांना रंगेहाथ पकडले होते तर फरार एपीआय केळे हा मंगळवारी एसीबीला शरण आला तर अशोक हंडीबागला त्याच्या घरून बेड्या ठोकल्या. पलायन केलेल थोरात अद्यापही फरार आहे.
खंडणीच्या गुन्ह्यात मदत करण्यासाठी चिंचपूर येथील एका व्यक्तीकडून ४० हजार रुपयांची लाच घेताना शनिवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सहायक फौजदार अमिरोद्दीन इनामदार, पो.हे.कॉ. दत्तात्रय बिक्कड, छत्रभुज थोरात (झिरो पोलीस) यांना रंगेहाथ पकडले होते तर एपीआय केळे व अशोक हंडीबाग हे फरार झाले होते. ताब्यात असलेल्यांपैकी छत्रभुज थोरातने लघुशंकेचा बहाणा करून पलायन केले होते. तो अद्यापही फरार आहे. दरम्यान, फरार असलेला एपीआय केळे मंगळवारी दुपारी एसीबीला शरण आला. तर हंडिबाग याला धारूर तालुक्यातील चिंंचपूर या त्याच्या गावातून बेड्या ठोकल्या. या दोघांनाही बुधवारी न्यायालयात हजर केले जाणार असल्याची माहिती एसीबीचे पोलीस उपअधीक्षक बाळकृष्ण हनपुडे पाटील यांनी दिली. पलायन केलेल्या आरोपीचा शोध सुरूच असल्याचेही ते म्हणाले.