मोठी बातमी; बीडमधील अवैध गर्भपात प्रकरण; महिला डॉक्टर पोलिसांच्या ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2022 02:50 PM2022-06-07T14:50:00+5:302022-06-07T14:52:58+5:30

या प्रकरणात पोलिसांनी सकाळीच मयताच्या नातेवाइकांना पोलीस अधीक्षक कार्यालयात बोलावून घेत चौकशी केली.

Big Breaking; Illegal abortion case in Beed; Female doctor in police custody | मोठी बातमी; बीडमधील अवैध गर्भपात प्रकरण; महिला डॉक्टर पोलिसांच्या ताब्यात

मोठी बातमी; बीडमधील अवैध गर्भपात प्रकरण; महिला डॉक्टर पोलिसांच्या ताब्यात

googlenewsNext

- सोमनाथ खताळ
बीड :
पहिल्या तीन मुली असलेल्या महिलेचा चौथ्यांदा गर्भ राहिल्यानंतर रविवारी मृत्यू झाला होता. यात शवविच्छेदन अहवालावरून हा अवैध गर्भपात असल्याचे समोर आले होते. मंगळवारी सकाळी पोलिसांनी पतीसह नातेवाईकांना ताब्यात घेतले होते. त्यानंतर दुपारी लगेच गेवराई येथील एका महिला डॉक्टरला ताब्यात घेण्यात आले आहे. बीड पोलिस या महिला डॉक्टरला घेऊन बीडला येत आहेत.

सीताबाई उर्फ शीतल गणेश गाडे (वय ३०, रा. बक्करवाडी, ता. बीड) असे मयत महिलेचे नाव आहे. शीतल या ऊसतोड मजूर असून, त्यांना अगोदरच ९, ६, आणि ३ वर्षांच्या तीन मुली आहेत. त्या चौथ्यांदा गर्भवती होत्या. परंतु, रविवारी अचानक त्यांना रक्तस्त्राव सुरू झाल्याने पहिल्यांदा खासगी आणि तेथून जिल्हा रुग्णालयात दाखल केले. परंतु, तत्पूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. यात संशय आल्याने पाच तज्ज्ञ डॉक्टरांच्या समितीकडून शवविच्छेदन करण्यात आले होते. यात हा अवैध गर्भपात असल्याचे स्पष्ट झाले होते. त्यामुळे राज्यात खळबळ उडाली होती. 

बीडमध्ये अवैध गर्भपाता दरम्यान महिलेचा मृत्यू; पोलिसांनी पतीसह नातेवाईकांना घेतले ताब्यात

या प्रकरणात पोलिसांनी सकाळीच मयताच्या नातेवाइकांना पोलीस अधीक्षक कार्यालयात बोलावून घेत चौकशी केली. त्यांनी याची कबुली दिली. त्यानंतर त्या सर्वांना घेऊन पोलिस ज्यांनी गर्भपात केला, अशा ठिकाणी पोहचले. गेवराई तालुक्यातील एका महिला डॉक्टरला पोलिसांनी दुपारी २.३० वाजता ताब्यात घेतले आहे. या कारवाईने खळबळ उडाली आहे. यात आणखी कोणाकोणाचा सहभाग आहे, याचा शोध पोलिस घेत आहेत. तसेच गर्भपात कोठे झाला आणि काढलेला गर्भाची कोठे विल्हेवाट लावली, याचा शोध पोलिस घेत आहेत.

Web Title: Big Breaking; Illegal abortion case in Beed; Female doctor in police custody

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.