Big Fight Video: साप अन् मुंगूसाची दीड तास झुंज; कोण जिंकलं असेल?
By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2023 12:38 PM2023-08-08T12:38:51+5:302023-08-08T12:41:41+5:30
आष्टी तालुक्यातील दादेगाव रामाचे येथील झुंज कॅमेऱ्यात कैद
नितीन कांबळे
कडा - मुंगूस आणि सापाचे शत्रूत्व सर्वश्रुत आहे. हे दोन प्राणी एकमेकांच्या समोर आले की त्यांच्यात लढाई होणार हे निश्चित. अशाच एका झुंजीचा थरार आष्टी तालुक्यातील दादेगाव रामाचे येथील रस्त्यावर मंगळवारी पाहायला मिळाला. एवढेच नव्हे तर दीड तासांच्या झुंजीनंतर सापाचा फडश्या पाडत मुंगूस त्याला ओढत घेऊन गेल्याचे पहावयास मिळाले.
मुंगूस आणि साप यांच्यातील शत्रुत्व सर्वांनाच माहित आहे. हे दोन प्राणी एकमेकांच्या समोर आले की, परस्परांशी भिडणार हे नक्की. मुंगूस आणि धामण जातीच्या सापाची अशीच कडवी झुंज बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील दादेगाव रामाचे येथे पाहायला मिळाली. धामण जातीचा साप आणि मुंगूसाच्या लढाईचा थरार आज सकाळी ऊसाच्या शेताच्या कडेला सुरू होता.
रस्त्याच्या कडेला मुंगूस आणि सापाचा हा संघर्ष सुरू होता. अखेर मुंगूसानं सापाला घायाळ केले. थेट सापाचा फणा तोंडात पकडून त्याला ओढत झुडुपात नेलं. तेव्हा कुठे हा थरार संपला. ही झुंज पाहण्यासाठी बघ्यांनी मोठी गर्दी केली होती.
बीड: आष्टी तालुक्यातील दादेगांव रामाचे येथील साप अन् मुंगूसाची झुंज एका शेतकऱ्याने कॅमेऱ्यात कैद केली. दीडतास चालेल्या झुंजीत अखेर मुंगसाने सापाचा फडशा पाडला pic.twitter.com/YbxZ3vQPJ2
— Lokmat Chhatrapati Sambhajinagar (@milokmatabd) August 8, 2023
मुंगुस सहज शिकार करते
मुंगसाची त्वचा आणि त्याच्या अंगावरील केस. मुंगसाची कातडी ही जाड असते, ज्यातून सापाचे दात आत जात नाही, तर केसांमुळेही सापाला मुंगसाला दंश करता येत नाही. याच गोष्टीमुळे मुंगूस कुठल्याही सापाची सहज शिकार करतं.असे कडा येथील सर्पमित्र अक्षय गरूड यांनी लोकमतला सांगितले.