बडे दिलवाला ! '..गरजवंताकडून पैसे कसे घेऊ' म्हणत वर्षभरापासून शिवभोजन थाळीचे मोफत वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 03:48 PM2021-04-17T15:48:09+5:302021-04-17T15:52:40+5:30

Free distribution of Shivbhojan Thali गेल्या वर्षभरापासून शासनाच्या नियमाप्रमाणे दररोज ७५ शिवभोजन थाळ्या लाभार्थ्यांना विनाशुल्क देत आहेत.

Big hearted! Free distribution of Shivbhojan Thali for the whole year saying '..how to get money from the needy' | बडे दिलवाला ! '..गरजवंताकडून पैसे कसे घेऊ' म्हणत वर्षभरापासून शिवभोजन थाळीचे मोफत वितरण

बडे दिलवाला ! '..गरजवंताकडून पैसे कसे घेऊ' म्हणत वर्षभरापासून शिवभोजन थाळीचे मोफत वितरण

Next
ठळक मुद्देसामाजिक कार्यकर्ते विनोद पोखरकर यांचा स्तुत्य उपक्रम वर्षभरात १ लाख ३६ हजार ८७५ रुपयांचा सहन केला तोटा

अंबाजोगाई - अंबाजोगाई येथील सामाजिक कार्यकर्ते विनोद सिद्रामप्पा पोखरकर  यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षभरापासून शिवभोजन थाळीचे मोफत वितरण करत आहेत. गेल्या वर्षभरापासून त्यांचा हा उपक्रम सुरूच आहे. या उपक्रमापोटी त्यांना वर्षभरात १ लाख ३६ हजार ८७५ रुपयांचा तोटा सहन करावा लागला आहे. मात्र, सामाजिक दायित्व समजून सुरु केलेल्या या सेवेत खंड पडणार नाही असा निर्धार पोखरकर यांनी व्यक्त केला आहे. 

अंबाजोगाई शहरात सामाजिक कार्यकर्ते विनोद पोखरकर यांनी सुरभी शिवभोजन केंद्र सुरू केले आहे. प्रारंभीच्या काळात प्रतिथाळी १० रुपये दर आकारण्याचे शासनाकडून निर्देश देण्यात आले. त्यानंतर या थाळीची किंमत ५ रुपये करण्यात आली. मात्र, कोरोनाचा संसर्ग वाढल्यामुळे गेल्यावर्षी मार्च महिन्यात लागू केलेल्या लॉकडाऊनपासून पोखरकर यांनी विनाशुल्क शिवभोजन थाळी देण्यास प्रारंभ केला. 

गेल्या वर्षभरापासून शासनाच्या नियमाप्रमाणे दररोज ७५ शिवभोजन थाळ्या लाभार्थ्यांना विनाशुल्क देत आहेत. या वर्षभरात  १ लाख ३६ हजार ८७५ रुपयांपेक्षा जास्तीचा तोटा सहन करूनही पोखरकर यांनी यावर्षी सुद्धा विनाशुल्क थाळी देण्याचा उपक्रम सुरूच ठेवला आहे. शिवभोजन थाळीसह पोखरकर यांचा सामाजिक कार्यात व दातृत्वात सातत्याने पुढाकार असतो. कोरोनाचा संसर्ग पूर्णपणे संपत नाही तोपर्यंत आपण विनाशुल्क शिवभोजन थाळी देण्याचा निर्धार केला असल्याचे पोखरकर यांनी सांगितले. 

वर्षभरात २७ हजार थाळ्या वितरण
सुरभी शिवभोजन कक्षातून वर्षभरात २७ हजार पेक्षाही ज्यास्त थाळ्याचे  विनाशुल्क वितरण करण्यात आले. गरजवंत आणि उपेक्षित नागरिकांना पैसे मागणे माझ्या मनाला पटले नाही. अगोदरच लॉकडाऊन व बेरोजगारीने त्रस्त असलेल्यांना आपण थोडा तरी आधार देऊ शकतो. या भावनेतूनच माझे काम सुरू आहे.
- विनोद पोखरकर, अंबाजोगाई.

Web Title: Big hearted! Free distribution of Shivbhojan Thali for the whole year saying '..how to get money from the needy'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.